नवी दिल्ली: मद्य धोरण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत गुरुवारी राऊज अॅव्हेन्यूच्या पीएमएलए न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी १ एप्रिलपर्यंत वाढ केली.
खंडणीखोरी करणाऱ्या भाजपचे हे आम आदमी पार्टीला संपविण्याचे कारस्थान असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात केला. ईडीचे अधिकारी अरविंद केजरीवाल यांच्याकडे त्यांच्या फोनचा पासवर्ड मागत आहेत. मात्र अरविंद केजरीवाल यांनी त्यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही.