नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत पेट्राेल आणि डिझेलच्या भडकलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. आता सणासुदीच्या दिवसांमध्येही लाेकांना महागाईपासून दिलासा मिळणार नसल्याचे चित्र आहे. कारण खाद्यतेलाच्या किमती भडकलेल्या असून, डिसेंबरपर्यंत त्यात घट हाेण्याची काेणतीही शक्यता नाही.
शेंगदाणा तेल २०० रुपये प्रतिलीटरवर पाेहाेचले आहे, तर साेयाबीन, सूर्यफूल, राइस ब्रान इत्यादी तेलांचे दरही १९० ते २०० रुपये प्रतिलीटरच्या जवळपास आहेत. त्यातून डिसेंबरपर्यंत दिलासा मिळण्याची शक्यता नाही. केंद्रीय खाद्य सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, नवे पीक बाजारात दाखल झाल्यानंतर, तसेच जागतिक पातळीवर दर कमी झाल्यानंतरच दिलासा मिळेल. डिसेंबरपासून दर घटतील. त्यातही खूप घट हाेणार नाही, असेही पांडे म्हणाले. त्यामुळे गणेशाेत्सव, नवरात्र आणि दिवाळी या महत्त्वाच्या सणांच्या काळात खाद्यतेल स्वस्त हाेणार नाही.
उपाययाेजनांचा परिणाम कमी खाद्यतेलाचे दर स्थिर ठेवण्यासाठी दाेन महिन्यांपूर्वी सरकारने आयात शुल्कात कपात केले हाेते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढलेल्या दरांचा परिणाम भारतात जाणवत आहे.
तेल २०२१ २०२० (रुपये प्रतिकिलाे)शेंगदाणा १८० १४२ पामतेल १३९ ८५ साेयाबीन १५५ १०२ सूर्यफूल १७५ १२० माेहरी १७५ १२०