ED Raid: चायनीज लोन अॅप्सप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ED ने Paytm, Easebuzz, Razorpay आणि Cashfree ची बँक आणि व्हर्चुअल खात्यांमधील 46.67 कोटी रुपये गोठवले आहेत. चायनीज लोन अॅप प्रकरणात काही दिवसांपूर्वीच ईडीने या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले होते.
या कंपन्यांवर छापे14 सप्टेंबर रोजी ईडीने दिल्ली, गाझियाबाद, लखनौ, मुंबई आणि बिहारमधील गयासह सहा ठिकाणी छापे टाकले होते. याशिवाय, एचपीझेड लोन अॅपवर नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ईडीने दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, जोधपूर आणि बंगळुरू येथील PayTM, Easebuzz, Razorpay आणि Cashfree या पेमेंट कंपन्यांच्या 16 ठिकाणी छापे टाकले.
Easebuzz खात्यांमध्ये 33.36 कोटी रुपये सापडलेया कंपन्यांच्या व्हर्च्युअल खात्यांमध्ये मोठी रक्कम ठेवण्यात आल्याचे ईडीला तपासादरम्यान समजले. EasyBuzz Pvt Ltd (Pune) च्या खात्यात 33.36 कोटी रुपये, Razorpay Software Pvt Ltd च्या खात्यात 8.21 कोटी रुपये, Cashfree Payments India Pvt Ltd च्या खात्यात 1.28 कोटी रुपये आणि Paytm च्या खात्यात 1.11 कोटी रुपये सापडले आहेत. ईडीच्या निवेदनानुसार, या विविध बँक खाती आणि आभासी खातींमधील सुमारे 46.67 कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली. नागालँड पोलिसांनी गेल्या वर्षी नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ईडी मनी लाँड्रिंगची चौकशी करत आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
HPZ टोकन ही अॅप आधारित कंपनी आहे, ज्याने बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली युजर्सना अधिक फायदे देण्याचे वचन दिले होते. सुरुवातीला युजर्सना HPZ टोकन F ने कंपनीत गुंतवणूक केल्यावर गुंतवणूक दुप्पट करण्याचे आमिष दाखवले हेत्. युजर्सकडून पेमेंट UPI आणि इतर पेमेंट गेटवेद्वारे गोळा केली. सुरुवातीला काही अंशी रक्कमही गुंतवणूकदारांना देण्यात आली. शिल्लक रक्कम विविध पेमेंट गेटवे आणि बँकांद्वारे विविध व्यक्ती आणि कंपन्यांच्या खात्यात हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.
ईडीने या महिन्याच्या सुरुवातीला रेझरपे प्रायव्हेट लिमिटेड, कॅशफ्री पेमेंट्स, पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड आणि चिनी व्यक्तींद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्थांची झडती घेतली होती. तपासादरम्यान ते बनावट पत्त्याच्या आधारे काम करत असल्याचे आढळून आले. चिनी व्यक्तींच्या नियंत्रणाखाली असलेल्या व्यापारी आयडी आणि बँक खात्यांमधून 17 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.