दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहाव्यांदा समन्स पाठवले आहे. ईडीने १७ फेब्रुवारीला केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. याआधी केजरीवाल यांना पाच समन्स पाठवण्यात आले होते पण ते ईडीसमोर हजर झाले नाहीत.
ईडीने ३१ जानेवारीला केजरीवाल यांना पाचवे समन्स पाठवले होते. तपास यंत्रणेने केजरीवाल यांना २ फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ते हजर राहिले नाहीत. ईडीने आतापर्यंत केजरीवाल यांना पाच वेळा समन्स पाठवले आहेत, मात्र ते एकदाही चौकशीसाठी आलेले नाहीत. समन्सचे पालन न केल्याने ईडीने याचिका दाखल केली होती.
बुलेट ट्रेन, घरे, आरोग्य..; 'मोदी 3.0' मध्ये देशाला काय मिळणार? पंतप्रधानांनी मांडला रोडमॅप
समन्सचे पालन न केल्यामुळे ईडीने केजरीवाल यांच्याविरोधात ३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. गेल्या शुक्रवारी, बुधवारी त्यांना ईडीने बजावलेल्या पाचव्या समन्सनंतरही ते चौकशीसाठी गेले नाहीत.