शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

‘एड्स ’ग्रस्तांना पक्षपाती वागणूक दिल्यास शिक्षा

By admin | Published: October 06, 2016 5:48 AM

एचआयव्ही/ एड्सग्रस्त व्यक्तींना सर्व प्रकारचे उपचार पुरविणे ही सरकारची जबाबदारी ठरविणाऱ्या आणि अश व्यक्तींना पक्षपाती वागणूक देणे हा गुन्हा ठरवून त्यासाठी दंडात्मक

नवी दिल्ली : एचआयव्ही/ एड्सग्रस्त व्यक्तींना सर्व प्रकारचे उपचार पुरविणे ही सरकारची जबाबदारी ठरविणाऱ्या आणि अश व्यक्तींना पक्षपाती वागणूक देणे हा गुन्हा ठरवून त्यासाठी दंडात्मक तरतूद करणाऱ्या सुधारित कायदा विधेयकाच्या मसुद्यास केंद्रीय मंत्रिमंडळने बुधवारी मंजुरी दिली.आधीच्या संपुआ सरकारने त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात सन २०१४ मध्ये ‘एचआयव्ही/ एड््स (प्रिव्हेन्शन अ‍ॅण्ड कन्ट्रोल) बिल’ हे प्रस्तावित कायद्याचे विधेयक तयार केले होते. परंतु तोे संसदेकडून मंजूर करून घ्यायचे राहून गेले. आता मोदी सरकारने त्या विधेयकात सुधारणा करून तसा कायदा करण्याचे ठरविले. त्याच्या सुधारित विधेयकाच्या मसुद्यास पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता हे सुधारित विधेयक येत्या अधिवेशनात संसदेत मांडले जाईल, अशी अपेक्षा आहे. या विधेयकानुसार ‘अ‍ॅन्टी रिट्रोव्हायरल ट्रीटमेंट’ (एआरटी) आणि शरीराची प्रतिकारशक्ती दुबळी झाल्याने वेलोवेळी होणाऱ्या नानाविध प्रकारच्या आजारांवर योग्य, संपूर्ण आणि वेळीच उपचार मिळणे हा एचआयव्ही/ एड््सग्रस्त व्यक्तींचा हक्क ठरविण्यात आला असून तशा उपचारांची सोय करणे सरकारवर बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच स्वत: एचआयव्ही/ एड््सग्रस्त व्यक्तीआणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींना नोकरी, शिक्षण, आरोग्यसेवा, सार्वजनिक सेवा, मालमत्ता हक्क, सार्वजनिक पदांवरील निवड-नियुक्त्या आणि विमा इत्यादी बाबतीत कोणत्याही प्रकारे पक्षपाती वागणूक देणे या प्रस्तावित कायद्यानुसार निषिद्ध ठरविण्यात येणार असून तसे करणाऱ्यांना शिक्षा करण्याचीही त्यात तरतूद असेल.या कायद्याचा भंग झाल्यास त्यासंबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक राज्यात एक ‘आॅम्ब्युड््समन’ नेमण्याचीही तरतूत या सुधारित विधेयकात आहे. हा ‘आॅम्ब्युड््समन’ दर सहा महिन्यांनी राज्य सरकारला अहवाल देईल.या प्रकारच्या आजाराने बाधित व्यक्तींच्या हक्कांचे रक्षण करणे, त्यांना पक्षपाती वागणूक मिळण्यास प्रतिबंध करणे, त्यांच्या वैद्यकीय उपचारांची सोय करणे आणि त्यांना समाजात सन्मानाने व बरोबरीने जगता यावे यासाठी अनुकूल पृष्ठभूमी तयार करणे हा या प्रस्तावित कायद्याचा उद्देश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)विधेयकातील तरतुदीएचआयव्ही/एड््सग्रस्त व्यक्तीसंबंधीची माहिती गोपनीय ठेवण्याचे बंधन.त्या व्यक्तीच्या संमतीनेच एड््सची चाचणी व उपचार करता येतील.आई/वडिलांना एड््स झाला असल्यास, त्या कुटुंबातील चांगली समज असलेले मूल, त्याच्या धाकट्या भावंडांच्या पालकत्वाची जबाबदारी पार पाडू शकले. हे पालकत्व शाळेत प्रवेश घेणे, मालमत्तेची व्यवस्था पाहणे इत्यादीसाठी असू शकेल.एचआयव्ही/एड््सग्रस्तांची प्रकरणे लवकर निकाली काढण्याचे न्यायालयांवर बंधन.अशा प्रकरणी संबंधित व्यक्तीची ओळख उघड न होता अथवा ‘इन कॅमेरा’ चालविणे.अशा व्यक्तीने पोटगीसाठी अर्ज केल्यास पोटगी ठरविताना त्याला उपचारांसाठी होणारा खर्चही विचारात घेणे.