शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

शिक्षणाचे, देशाचे भगवेकरण करू!

By admin | Published: June 21, 2016 7:33 AM

शिक्षणाचे आणि देशाचे भगवेकरण केले जाईल. यातील जे देशासाठी चांगले असेल ते घडेल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांनी म्हटले.

लखनौ : शिक्षणाचे आणि देशाचे भगवेकरण केले जाईल. यातील जे देशासाठी चांगले असेल ते घडेल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांनी म्हटले. शिक्षणाचे आणि देशात भगवेकरण केले जाईल, असे मी म्हणतोय. भगवेकरण म्हणा की संघवाद. तो जर देशासाठी चांगला असेल, तर तसे निश्चितपणे घडेल. कथेरिया येथे लखनौ विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४२ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त ‘हिंदवी स्वराज दिवस समारोह’ कार्यक्रमात बोलत होते. कथेरिया यांच्या या विधानामुळे मोदी सरकारवर टीका करण्यासाठी विरोधकांना आयतेच निमित्त मिळाले आहे. भगवेकरण देशाच्या लाभाचे आहे. देशाच्या चांगल्यासाठी जे काही आहे, मग तुम्ही त्याला भगवेकरण म्हणा की संघवाद, परंतु ते केले जाईल, असे ते म्हणाले. आम्ही प्रदीर्घ काळापासून हे बघत आहोत. देश जगात अभिमानाने ज्यावर उभा राहू शकतो, अशा गोष्टी अभ्यासक्रमाचा भाग बनवायच्या नाहीत का? त्या गोष्टी आमच्या मुलांना शिकवायच्या नाहीत का? महाराणा प्रताप किंवा शिवाजी महाराज यांच्याबद्दल विद्यार्थी वाचन करणार नसतील, तर ते घेंगीस खानाबद्दल वाचतील. शिवाजी महाराजांमुळे स्वातंत्र्यासाठी प्रेरणा मिळाली. भारताचा इतिहास हा काही लोकांना सोयीचा व्हावा, असा बनविण्यात आला, असा दावा करून कथेरिया यांनी असा इतिहास हा भारताचे फार मोठे दुर्दैव असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणी एका पक्षाची खासगी मालमत्ता किंवा दलितांची मालमत्ता समजले जाते. आंबेडकर हे केवळ आदर्श नेतेच नव्हते, तर संपूर्ण जगासाठी राष्ट्रवादी नेते होते, असे ते म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेत्यांच्या त्यागाचा उल्लेख करून कथेरिया म्हणाले की, हे नेते मानवतेसाठी व देशाच्या भल्यासाठी जगले. उत्तर प्रदेशाच्या शैक्षणिक मागासलेपणासाठी त्यांनी सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या सरकारला दोष दिला. (वृत्तसंस्था)अयोध्येतील बाबरी मशीद पाडणे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट होती, असे सांगत त्या जागी राम मंदिर आम्ही बांधणारच, आम्हाला कोणी रोखू शकणार नाही, असा दावा भाजपाचे खा. योगी आदित्यनाथ यांनी येथे केला. बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आली होती. त्यामुळे ६ डिसेंबर हा हिंदू शौर्य दिन म्हणून साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.‘कैराना स्थलांतर’ हा मुद्दा नाही : नायडूमुजफ्फरनगर : २०१७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश राज्य विधानसभा निवडणुकीत ‘कैराना स्थलांतर’ हा मुख्य मुद्दा असणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केले आहे. ‘कैराना स्थलांतर हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. भाजपा केवळ विकासाच्या मुद्द्यावर येथील निवडणूक लढेल,’ असे नायडू म्हणाले. एका विशिष्ट समाजाने दिलेल्या धमकीमुळे कैरानातील हिंदू कुटुंबांनी गाव सोडून अन्यत्र आश्रय घेतल्याचा आरोप भाजपाच्या खासदाराने केला होता. नायडू म्हणाले, ‘राज्यसभेच्या निवडणुकीत मुस्लीम उमेदवार (मुख्तार अब्बास नकवी आणि एम.जे. अकबर) उभे करणारा भाजपा हा एकमेव पक्ष आहे. राज्यसभेच्या ५७ रिक्त जागांपैकी एकाही जागेवर अन्य पक्षांनी मुस्लीम उमेदवार उभा केला नाही,’ असे नायडू म्हणाले.