शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

नरेंद्र मोदींमुळे मुस्लिम मुलीला मिळालं एज्युकेशन लोन

By admin | Published: March 23, 2017 1:21 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 दिवसांच्या आत त्या मुस्लिम मुलीला प्रतिसाद दिला असून, तिला 1.5 लाखांचं एज्युकेशन लोनही मंजूर झालं

ऑनलाइन लोकमतकर्नाटक, दि. 23 - पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. अनेकदा त्यांनी प्रसंगावधान दाखवत गरिबांना मदत केली आहे. भारतीय तरुण-तरुणींनी अधिकाधिक शिकावं यासाठी ते आग्रही असतात. त्याप्रमाणेच त्यांनी शिक्षा अभियानासारख्या अनेक योजनाही राबवल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी गरिबीमुळे एमबीएचे शिक्षण घेण्यात अडचणी येत असलेल्या 21 वर्षीय मुस्लिम युवती सारा हिला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शैक्षणिक कर्ज मिळावं, यासाठी त्यांना पत्र लिहिलं होतं. माझ्या वडिलांना आठ महिने पगार मिळाला नाही. त्यामुळे एमबीएची फी भरण्यासाठी मला पैशांची गरज आहे, असं तिने पत्रात नमूद केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 दिवसांच्या आत त्या मुस्लिम मुलीला प्रतिसाद दिला असून, तिला 1.5 लाखांचं एज्युकेशन लोनही मंजूर झालं आहे. कर्नाटकमधील मांड्या येथे राहणा-या सारा या मुलीचे वडील एका कारखान्यात कामाला आहेत. मात्र कारखानदारांनी त्यांना आठ महिन्याचा पगारच दिला नाही. तिला एमबीएचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्ज हवे होते. मात्र बँकांनी तिला हप्ते भरण्यास कार्यक्षम नसल्यानं कर्ज नाकारले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींना पत्र लिहून तिने मदतीची मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुलीची मदत केल्याने तिला शैक्षणिक कर्ज मंजूर झाले आहे. त्यानंतर सारा म्हणाली, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठ्या आशेनं पत्र पाठवले होते. मात्र, त्याला एवढ्या लवकर प्रतिसाद मिळेल, अशी आशा नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून 10 दिवसांच्या आत पत्राला उत्तर दिले. मोदींच्या मदतीमुळे माझे एमबीएचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून, माझे कुटुंबीयही आनंदी असल्याचे सारा म्हणाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कृतीचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.