नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक (Dr Ramesh Pokhriyal Nishank) यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आले आहे. कोरोना बरे झाल्यानंतर होणाऱ्या आरोग्या संदर्भातील तक्रारींमुळे (Post COVID-19 Complications) त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती एम्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Education Minister Ramesh Pokhriyal Nishank admitted to AIIMS with post-Covid complications)
याआधी डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या एप्रिल महिन्यात डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह झाली होती. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली होती. त्यानंतर उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी आपले कामकाज पुन्हा सुरू केले. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकींना उपस्थित राहत होते.
दरम्यान, डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडून आजच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेतला जाणार होता. बारावीच्या परीक्षांबाबत 1 जून रोजी हा निर्णय घेतला जाईल आणि त्याकरता बैठकही घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, आता डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेतला जाणार की नाही, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.