संयुक्त राष्ट्र : जागतिक आरोग्य संघटना (हू) जागतिक आरोग्य सुश्रूषा कार्यक्रमात योगाच्या समावेशासाठी झटत असून ही संघटना भारतासह सहकारी केंद्रांची मदत घेत आहे. संयुक्त राष्ट्रातील हू कार्यालयाच्या कार्यकारी संचालिका नाता मेनाब्दे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला सांगितले की, शास्त्रीय आधारासह योगाला अद्वितीय ज्ञानाचा दर्जा देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. भारताने जगाला दिलेल्या या प्राचीन अमूल्य भेटीचा अभ्यास करण्याची, शास्त्रीय कसोटीच्या आधारे ते सिद्ध करण्यासह जागतिक आरोग्य सुश्रूषा कार्यक्रमात समावेश करण्याची आवश्यकता आहे. काही योगक्रियांचे प्रमाणीकरण करून जागतिक सुश्रूषा कार्यक्रमात त्याचा समावेश करता यावा यासाठी आपण भारत व जगभरातील केंद्रांसोबत काम करीत आहोत, असेही त्या म्हणाल्या.
आरोग्य सुश्रूषा कार्यक्रमात योगाच्या समावेशाचा प्रयत्न
By admin | Published: June 21, 2015 1:15 AM