शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शेतमालाच्या निर्यातवाढीसाठी प्रयत्न

By admin | Published: November 11, 2016 4:28 AM

भारतातल्या कृषी उत्पादनांसह विविध प्रकारच्या उत्पादनांना निर्यातीच्या माध्यमातून परदेशी बाजारपेठ प्राप्त व्हावी, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालय अविरत प्रयत्न करीत आहे.

नवी दिल्ली : भारतातल्या कृषी उत्पादनांसह विविध प्रकारच्या उत्पादनांना निर्यातीच्या माध्यमातून परदेशी बाजारपेठ प्राप्त व्हावी, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालय अविरत प्रयत्न करीत आहे. पारंपारिक वस्तूंबरोबरच आयुर्वेदिक औषधांचाही जगभर प्रसार व्हावा, यासाठी जगातल्या नव्या बाजारपेठा आम्ही शोधल्या आहेत. दक्षिण आफ्रिका, लॅटिन अमेरिका सारख्या देशांना भारतीय उत्पादनांकडे आकर्षित करण्यात आम्हाला यश आले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थविषयक संपादकांच्या परिषदेत केले.सीतारामन म्हणाल्या, नाशिक व देशातील अन्य भागांतून द्राक्षांची निर्यात २५ वर्षांपासून सुरू आहे. निर्यात व्यवसायात येणाऱ्या अडचणींबाबत नाशिकचे द्राक्ष उत्पादक अलीकडेच मला भेटले. त्यांच्या समस्यांकडे माझे लक्ष आहे. द्राक्ष निर्यातदारांना अ‍ॅपेडाचे अधिकाधिक सहकार्य मिळावे, यासाठी मी सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रातला साखर उद्योग सध्या संकटात आहे. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना साखर निर्यातीतूनच थोडी कमाई होते. या निर्यातीवर सध्या केंद्र सरकारने बंदी घातली आहे, ही बंदी उठवण्यासाठी शरद पवारांनी मध्यंतरी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्याबाबत विचारता सीतारामन म्हणाल्या की, देशी बाजारपेठेत साखरेचे भाव प्रमाणाबाहेर वाढू नयेत, यासाठी सरकारतर्फे काही वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध घातले जातात. मात्र ही बंदी दीर्घकाळासाठी नसते. ग्राहकसंरक्षण मंत्रालयाची हरकत नसल्यास साखरेच्या निर्यातीला आमच्या मंत्रालयाची हरकत असण्याचे कारण नाही. आॅरगॅनिक साखर, खांडसरी इत्यादींच्या निर्यातीवर बंदी नाही. निर्यातदारांनी त्या पर्यायांचा विचार करायलाही हरकत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)