शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

...म्हणून देशात अंडी अन् चिकनचे दर घसरले, किमतीत 30 टक्क्यांची कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 11:49 AM

चीनमध्ये पसरलेल्या कोरोना(Coronavirus)  व्हायरसचा प्रभाव भारतातही दिसायला लागला आहे.

ठळक मुद्देचीनमध्ये पसरलेल्या कोरोना(Coronavirus)  व्हायरसचा प्रभाव भारतातही दिसायला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अंडी आणि चिकन(Eggs and Chicken)च्या दरांमध्ये 30 टक्क्यांची घसरण झाली आहे. व्हॉट्सऍप आणि फेसबुकच्या माध्यमातून कोरोना व्हायरससंदर्भात वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज पाठवून लोकांना घाबरवलं जात आहे.

नवी दिल्लीः चीनमध्ये पसरलेल्या कोरोना(Coronavirus)  व्हायरसचा प्रभाव भारतातही दिसायला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अंडी आणि चिकन(Eggs and Chicken)च्या दरांमध्ये 30 टक्क्यांची घसरण झाली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्च्या रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर कोरोना व्हायरससंदर्भात काही मेसेज व्हायरल केले जात आहेत. व्हॉट्सऍप आणि फेसबुकच्या माध्यमातून कोरोना व्हायरससंदर्भात वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज पाठवून लोकांना घाबरवलं जात आहे. त्यामुळे देशात अंडी आणि चिकनच्या मागणीत घट झालेली असून, किमती घसरल्या आहेत. स्वस्त झाली अंडी आणि चिकनः नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी (NECC)च्या आकड्यांनुसार, अंड्यांच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 15 टक्के कपात झाली आहे. नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी (NECC)च्या आकड्यांनुसार अंड्यांच्या किमती फेब्रुवारी 2019च्या तुलनेत 14 टक्क्यांनी खाली आल्या आहेत. तर मुंबईत मागणीत 13 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. चेन्नईमध्ये 12 टक्के आणि वारंगल(आंध्र प्रदेश)मध्ये 16 टक्क्यांची कपात नोंदवण्यात आली आहे. दिल्लीत अंड्यांच्या किमती (100) 358 रुपयांवर आल्या आहेत. तर गेल्या वर्षी एवढ्या अंड्यांची किंमत 441 रुपयांच्या जवळपास होती. दिल्लीत ब्रॉयलर चिकनच्या किमती जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याच्या तुलनेत 86 रुपयांनी घसरून 78 रुपये प्रति किलोग्रॅमवर आल्या आहेत. अशाच प्रकारे दुसऱ्या शहरांमध्ये चिकनचे दर पडले आहेत. खरं तर थंडीच्या दिवसांत चिकन आणि अंड्यांना जास्त मागणी असते. परंतु सध्या मागणीत घट आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घाऊक बाजारात चिकन आणि अंड्यांची किंमत 15-30 टक्क्यांनी घसरली आहे. पोल्ट्री फार्मशी संबंधित व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, व्यापाऱ्यांना सध्या दुपटीनं फटका बसत आहे. कोंबड्यांना आहार देणे महाग झाले आहे. मागील हिवाळी हंगामाच्या तुलनेत कोंबडीच्या खाद्याच्या किमती 35-45 टक्क्यांनी जास्त आहेत. यामुळे पोल्ट्री व्यवसाय करणंही जोखमीचं झालं आहे. चिकन आणि अंड्यांच्या मागणीत घसरण आल्यानं शेतकरी चिंतातुर झाला आहे. समाज माध्यमातून पसरवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेसेजमुळे देशात अंडी आणि कोंबडीची मागणी कमी झाल्याचंही शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.