ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - मुस्लिम समाजाला उत्सुकता असलेल्या चंद्राचे दर्शन शुक्रवारी राक्षी आठच्या सुमारास झाले असून चंद्रदर्शन झाल्याने देशभरात उद्या ईद साजरी करावी अशी घोषणा दिल्लीतील जामा मस्जिदचे शाही इमाम अहमद बिलाल यांनी केली आहे.
गेल्या महिनाभरापासून देशभरातील मुस्लिम समाज रमझान पाळत असून हा महिनाभर मुस्लिम बांधव रोझा (उपवास) करतात. अमावस्येनंतर चंद्रद्रशर्न झाल्यावर ईदची घोषणा केली जाते. यासाठी प्रत्येक शहरातील जामा मस्जिदमध्ये चांद समिती असते. या समितीती सदस्य व आणखी दोन जणांनी चंद्र बघितल्याची साक्ष दिली की ईदचे चंद्रद्रर्शन झाल्याची घोषणा केली जाते. शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्याची घोषणा दिल्लीतील जामा मस्जिदच्या शाही इमामांनी केली आहे. ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव रोझा सोडतात.