शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

हिमाचलमध्ये दरड कोसळून आठ ठार

By admin | Published: August 18, 2015 10:17 PM

हिमाचल प्रदेशच्या मणिकरणमध्ये मंगळवारी दुपारी दरड कोसळल्याने ऐतिहासिक मणिकरण साहिब गुरुद्वारालगतची इमारत पडून आठजण

मणिकरण: हिमाचल प्रदेशच्या मणिकरणमध्ये मंगळवारी दुपारी दरड कोसळल्याने ऐतिहासिक मणिकरण साहिब गुरुद्वारालगतची इमारत पडून आठजण ठार तर दहा जखमी झाले.कुल्लुचे उपायुक्त राकेश कंवर यांनी आठ मृतदेह मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून बचाव कार्य अजूनही सुरू आहे. मृतांची संख्या वाढू शकते असे प्रत्यक्षदर्र्शींचे म्हणणे आहे. कारण ही दुर्घटना घडली त्यावेळी गुरुद्वाराला लागूनच असलेल्या या इमारतीत मोठ्या संख्येत लोक आश्रयाला होते. या इमारतीत राहणारे बहुतांश लोक बाहेरचे असल्याने मृतदेहांचा शोध आणि त्यांची ओळख पटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुद्वारा प्रशासनाची मदत मागितली आहे. इमारतीवर दरड कोसळताच लोक सैरावैरा धावत सुटले आणि या तीन मजली इमारतीचा एक भाग कोसळल्याने अनेक लोक मलब्याखाली दबले. स्थानिक लोक आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने बचाव कार्य सुरू केले. जखमींना कुल्लुच्या इस्पितळात दाखल करण्यात आले असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे. (वृत्तसंस्था)