सुकमा - सुकमा येथे नक्षली हल्ल्यांमध्ये CRPFचे 9 जवान शहीद झाले आहेत. तर अनेकजण जखमी असण्याची शक्यता आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. रात्री जगंलात गस्त घालत असताना नक्षलींनी आयईडी स्फोटकांच्या साहाय्यानं CRPFच्या 212 बटालियनजवळ आधी भू-सुरुंग स्फोट घडवून आणला व नंतर बेछूट गोळीबार केला. यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत. या हल्ल्यात 10 जवान जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.
सुकमा जिल्ह्यातील किस्तराम इथं हा हल्ला झाला. रात्री गस्त घालण्यासाछी सीआरपीएफचे जवान एंटी लँजमाईन वाहनांनी जात होते त्यावेळी सुरुंगाद्वारे स्फोट घडवून आणला. यामध्ये वाहन जळून खाक झालं. सीआरपीएफच्या 112 बटालियनचे जवानांकडून या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. यावेळी येथील जंगलात दबा धरून बसलेल्या सुमारे 100 नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य केलं.
सुरुवातीला जवानांचं भू-सुरुंग विरोधी वाहन उडवून देण्यात आलं. त्यानंतर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात 9 जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर, दहा जवान जखमी झाले. स्थानिक पोलिसांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार धूमश्चक्री सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतं.