शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ए. के. अँटोनी, ओवेसी, ओ’ब्रायन, वंदना चव्हाण यांच्यासह ८ जणांना लाेकमत पार्लमेंटरी अवाॅर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 7:20 AM

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांचीही प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या ज्युरी मंडळाने एकमताने सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून निवड केली.

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी, बिजू जनता दलाचे भर्तृहरी मेहताब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, भाजपचे तेजस्वी सूर्या, आरजेडीचे प्रा. मनोजकुमार झा,  भाजपच्या लॉकेट चॅटर्जी यांच्यासह संसदेच्या आठ सदस्यांची २०२२ सालच्या लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे.

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांचीही प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या ज्युरी मंडळाने एकमताने सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून निवड केली. सर्वात विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित लोकमत संसदीय पुरस्कार दरवर्षी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये (४ लोकसभेतून आणि ४ राज्यसभेतून) उत्कृष्ट संसद सदस्यांना त्यांच्या योगदानासाठी दिले जातात.

लोकमत पार्लमेंटरी अवाॅर्ड निवड समितीचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीला लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, आरएसपीचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन, राज्यसभेचे माजी सरचिटणीस योगेंद्र नारायण, दी प्रिंटचे संस्थापक व एडिटर-इन-चीफ शेखर गुप्ता, टीव्ही ९ भारतवर्षचे वृत्त संचालक हेमंत शर्मा, लोकमतचे वरिष्ठ संपादक (बिझीनेस-पॉलिटिक्स) शरद गुप्ता, लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता उपस्थित होते. 

ज्युरी बोर्डचे सदस्य असलेले माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुगाता रॉय आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी त्यांच्या व्यस्ततेमुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, तर निवड समितीचे सदस्य असलेले भर्तृहरी मेहताब यांनी निवड प्रक्रियेतून माघार घेतली.  ज्युरी बोर्डने विजेत्यांची निवड करण्यासाठी सर्व संसद सदस्यांच्या २०२० आणि २०२१ या वर्षातील संसदीय योगदानाचा अभ्यास केला.

लोकमत संसदीय पुरस्कारांची संकल्पना २०१७ मध्ये संसद सदस्यांद्वारे वर्षभर करीत असलेल्या सकारात्मक कामांना ओळखण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी करण्यात आली होती. त्यानुसार २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये उत्कृष्ट संसद सदस्यांना माननीय उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू  यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोविड महामारीमुळे गेली दोन वर्षे पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शरद पवार, मुलायम सिंग, शरद यादव, सीताराम येचुरी, जया बच्चन, सुप्रिया सुळे, निशिकांत दुबे, हेमा मालिनी, भारती पवार, सुष्मिता देव, मीनाक्षी लेखी, खासदार आणि डॉ. रजनी पाटील या पूर्वीच्या सत्रात विजेते ठरले आहेत.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीVandana Chavanवंदना चव्हाणLokmatलोकमत