शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

जम्मू-काश्मीरसह आठ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा द्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 5:26 PM

जम्मू-काश्मीरसह आठ राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा द्या, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरसह आठ राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा द्या, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. भाजपा नेते व पेशानं वकील असलेल्या अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. लक्षद्वीप, नागालँड, मेघालय, जम्मू-काश्मीर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर व पंजाब राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्याकांना मिळणारे अधिकारही दिले जावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार या आठही राज्यांत हिंदू अल्पसंख्याक आहेत. लक्ष्यद्वीप (2.5 टक्के), मिझोरम (2.7 टक्के), नागालँड(8.75 टक्के), मेघालय (11.53 टक्के), जम्मू कश्मीर (28.44 टक्के), अरुणाचल प्रदेश (29 टक्के), मणिपूर (31.39 टक्के) व पंजाबमध्ये ( 38.40 टक्के) अल्पसंख्याक आहेत. परंतु राज्यांतील हिंदूंना अद्याप अल्पसंख्यांक घोषित करण्यात आलेलं नाही, याकडंही याचिकेत लक्ष वेधण्यात आलं आहे. कोणत्याही समुदायाला अल्पसंख्यांकांचा दर्जा देताना तो त्याच्या लोकसंख्येच्या आधारेच दिला पाहिजे, असा युक्तिवादही उपाध्याय यांनी केला आहे.23 ऑक्टोबर 1993 मध्ये केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून मुस्लिमांसह ख्रिश्चन, शिख, बौद्ध व पारसी अशा समुदायातील लोकांना अल्पसंख्यांकांचा दर्जा दिला होता. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992मध्ये अस्तित्वात आला. 17 मे 1993मध्ये जम्मू कश्मीरला सोडून हा अध्यादेश पूर्ण भारतात लागू झाला. हा अध्यादेश असंवैधानिक असल्याचं घोषित करण्याची मागणीही याचिकेत केली आहे.

टॅग्स :Courtन्यायालय