काठमांडू : नेपाळमधील एका रिसॉर्टमध्ये गॅस हीटरमधून वायुगळती झाल्याने गुदमरून मरण पावलेल्या आठ भारतीय पर्यटकांचे मृतदेह गुरुवारी विमानाने भारतात आणण्यात येणार आहेत. या मृतदेहांची शवचिकित्सा करण्यात आली. केरळमध्ये या घटनेने दु:खाचे वातावरण आहे.या आठ जणांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेपाळ सरकारने पाच जणांची समिती नेमली आहे. या प्रकरणाचा अहवाल पंधरा दिवसांत सादर करा, असा आदेश नेपाळ सरकारने या समितीला दिला आहे. केरळमधून नेपाळमध्ये पर्यटनासाठी १५ पर्यटकांचा एक गट गेला होता. नेपाळमधील मकवानपूर जिल्ह्यातील रिसॉर्टमध्ये चार खोल्या बुक करूनही हे पर्यटक सोमवारी रात्री दोन खोल्यांतच राहिले. त्यातील आठ जण एका खोलीत व बाकीचे दुसऱ्या खोलीत होते.वातावरण उबदार राहावे म्हणून एका खोलीतील पर्यटकांनी गॅस हीटर सुरू केला. या खोलीच्या खिडक्या, दारे आतून कड्या लावून त्यांनी बंद केली होती.
आठ पर्यटकांचे मृतदेह आज नेपाळमधून देशात आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 4:48 AM