शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

आठवा खनिज ई-लिलाव 47 लाख टनांचा; मात्र फटका 470 कोटींचा

By admin | Published: August 16, 2015 11:44 PM

- तिजोरीचे नुकसान कोण भरून देणार? अभ्यासकांचा सरकारला खडा सवालपणजी : सरकारने आठव्या आणि अंतिम ई-लिलावात तब्बल 47 लाख 23 हजार 149 टन खनिज विक्रीस काढणार असल्याचे जाहीर केले आहे. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा खनिज लिलाव ठरणार आहे. दुसरीकडे लिलावास विलंब लावल्याने तब्बल 470 कोटी रुपयांना सरकारी तिजोरीला मुकावे लागले ...


- तिजोरीचे नुकसान कोण भरून देणार? अभ्यासकांचा सरकारला खडा सवाल
पणजी : सरकारने आठव्या आणि अंतिम ई-लिलावात तब्बल 47 लाख 23 हजार 149 टन खनिज विक्रीस काढणार असल्याचे जाहीर केले आहे. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा खनिज लिलाव ठरणार आहे. दुसरीकडे लिलावास विलंब लावल्याने तब्बल 470 कोटी रुपयांना सरकारी तिजोरीला मुकावे लागले असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
खाणविषयक अभ्यासक तथा अर्थतज्ज्ञ राजेंद्र काकोडकर म्हणाले की, र्पीकर मुख्यमंत्री असताना खनिजाचा ई-लिलाव केला असता तर याच 47 लाख टनांना प्रति टन 1000 रुपये जास्त मिळाले असते; परंतु र्पीकरांनी दर वाढतील म्हणून वाट पाहिली आणि खनिज तसेच ठेवले. तिजोरीचे झालेले हे नुकसान र्पीकर आता कसे भरून देणार हे त्यांनी जनतेसाठी स्पष्ट करायला हवे. न्यायालयाने ई-लिलावाचा आदेश नोव्हेंबर 2013 मध्ये दिला होता. त्याच वेळी लिलाव केला असता तर तिजोरीचा फायदा झाला असता. दोन वर्षे वाट पाहण्याची काय गरज होती, असा सवाल काकोडकर यांनी केला. सरकारकडे अशी कोणती अभ्यासू यंत्रणा आहे की जी आंतरराष्ट्रीय दरांबाबत ठोस सांगू शकते, हे लोकांनाही कळायला हवे, असे ते म्हणाले.
आठव्या ई-लिलावात विक्रीला काढला जाणार असलेला खनिज माल वेगवेगळ्या खाणींच्या ठिकाणी तसेच जेटींवर आहे. कुडणे, डिचोली, सुर्ला, साखळी, शिरगाव, कष्टी-सांगे, बिंबल, पाटये-तुडव, शिगाव, सोनूस, सुळकर्णे, मायणा-केपे, मुगाळी, कुर्पे आदी खाणींच्या ठिकाणी तसेच शिरसई, सारमानस, वाघुस, सुर्ला, सावर्डे, शेळवण आदी जेटींवर हा माल लंप्स, फाईनच्या स्वरूपात आहे.
याआधीच्या सात ई-लिलावांमध्ये सुमारे 60 लाख टन खनिज विकले गेले असून त्यातून 800 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. आठव्या आणि अंतिम ई-लिलावातून किमान 500 कोटी रुपयांची अपेक्षा सरकारने ठेवली आहे. या खनिज मालाच्या बोलीचा दर आणि लिलावाची तारीख कालांतराने जाहीर केली जाणार आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत सर्व खनिज मालाचा लिलाव पूर्ण करण्यात येणार आहे.
अभ्यासकांच्या मते, खाण व्यवसाय तेजीत होता तेव्हा 2011 मध्ये दर महिन्याला 70 लाख टन खनिजसुध्दा निर्यात केले गेले आहे. त्या तुलनेत एकाच वेळी 47 लाख टन खनिजाचा लिलाव ही मोठी बाब नव्हे.
(प्रतिनिधी)