- एस. पी. सिन्हा
नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने पत्र पाठवून विचारले आहे की, ते ईडीसमोर हजर होतील की ईडीलाच त्यांच्याकडे यावे लागेल. हे पत्र ईडीचे आठवे समन्स मानले जात आहे. या पत्राच्या उत्तरासह १६ ते २० जानेवारीपर्यंत हजर राहण्यास ईडीने त्यांना सांगितले आहे.
गेल्या महिन्यात ईडीने हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्या चौकशीचे ठिकाण, वेळ आणि तारीख सांगण्यास सांगितले होते. ईडीने मुख्यमंत्र्यांकडून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत उत्तर मागितले होते.
ईडीने असा इशाराही दिला होता की, जर सोरेन यावेळीही हजर झाले नाहीत तर तपास एजन्सीला मनी लाँड्रिंगविरोधी कायद्याच्या तरतुदींनुसार पुढील कायदेशीर कारवाई करावी लागेल. या काळात दोन्ही बाजूंकडून सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी केवळ पत्र पाठवून उत्तर दिले आहे.