शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

मनसेच्या उमेदवारांचे ‘एकला चलो रे’

By admin | Published: February 15, 2017 5:30 PM

राज यांच्या सभेवर ठरणार भवितव्य

नाशिक : शिवसेना-भाजपाकडून दुय्यम फळीतील नेत्यांच्या जाहीर सभांना सुरुवात झालेली असताना सत्ताधारी असलेल्या मनसेला मात्र नेत्यांची चणचण भासत आहे. मनसेचे बव्हंशी नेते मुंबई - ठाणे महापालिका निवडणुकीत अडकल्याने नाशिकच्या उमेदवारांना एकट्यानेच इंजिन ओढावे लागत आहे. दरम्यान, येत्या शुक्रवारी (दि.१७) होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेवरच मनसेच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असून, राज नेमके काय बोलतात, याचीही नाशिककरांना उत्सुकता लागलेली आहे. महापालिकेत गेल्या पाच वर्षांत सत्ता उपभोगणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यंदा ९७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चिन्ह वाटपानंतर गेल्या आठ दिवसांत मनसेच्या एकाही नेत्याची जाहीर सभा अथवा चौक सभा झालेल्या नाहीत. मनसेच्या ‘राजगड’ पक्ष कार्यालयात अद्यापही शांतताच असून, पक्षाचे उमेदवार मात्र आपापल्या स्तरावर प्रचार करताना दिसून येत आहे. बव्हंशी उमेदवारांनी मनसेची निशाणी असलेल्या ‘इंजिन’ची प्रतिकृती तयार केली आहे. त्यावर ‘आपल्या राजाला साथ द्या, मनसेला मत द्या’ हे गीत वाजविले जात आहे. तूर्त तरी मनसेच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिलेला आहे. पक्षाचे संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर तळ ठोकून असले तरी त्यांचीही दमछाक होताना दिसून येत आहे. मनसेचे स्टार प्रचारक माजी आमदार बाळा नांदगावकर, रश्मी ठाकरे, नितीन सरदेसाई यांच्या जाहीर सभा विभागनिहाय होणार असल्याचे सांगितले जात होते, परंतु हे स्टार प्रचारक मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांमध्येच अडकून पडले आहेत. त्यामुळे नेतेमंडळी उपलब्ध होणे स्थानिक मनसेला अवघड होऊन बसले. मनसेने एलईडी व्हॅनमार्फत आजवर केलेल्या कामांचा प्रचार करण्याची मोहीम आखली असली तरी अद्यापही त्या रस्त्यावर आलेल्या नाहीत. त्यामुळे उमेदवार आपापल्या स्तरावरच प्रचारपत्रके तयार करत घरोघर फिरताना दिसून येत आहेत. मनसेचे शहराध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांचेही नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. परंतु, ढिकले हे सुद्धा त्यांच्या प्रभागातील पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अडकून पडले आहेत. यंदा कोणतीही लाट नसली तरी आहे ते अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान मनसेपुढे आहे. मागील निवडणुकीत मनसेच्या पारड्यात २८.२३ टक्के मते पडली होती. यंदा त्यात भर पडते की घट होते, हे २३ फेबु्रवारीला निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.