गुवाहाटी : शिवसेेनेच्या बंडखोर आमदारांसाठी आसाममधील गुवाहाटीमध्ये रॅडिसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलमध्ये ७० खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. या खोल्यांचे आठवडाभराचे एकत्रित भाडे ५८ लाख रुपये आहे अशी माहिती जाणकारांनी दिली. या आमदारांच्या खानपानावर दररोज ८ लाख रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याचे कळते.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या बंडखोर आमदारांना सोमवारी प्रथम सूरत येथे नेण्यात आले. तिथून बुधवारी भाजपची सत्ता असलेल्या आसाममध्ये गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये हलविण्यात आले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या निवास व खानपान, त्यांचा चार्टर्ड विमानाने होणारा प्रवास यावर काही कोटी रुपये खर्च होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे राजकीय पक्षांवर सामान्यांकडून टीकेचा भडीमार होत आहे.
ही आहेत हॉटेल रॅडिसन ब्लूची वैशिष्ट्ये- या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकूण १९० खोल्या आहेत. - त्यातील ७० खोल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी बुक करण्यात आल्या आहेत.- या हॉटेलचे व्यवस्थापन सध्या कोणाचेही नवीन बुकिंग घेत नाही.- रेडिसन ब्लूचे बॅक्वेट बंद करण्यात आले आहे.- सध्या या हॉटेलमध्ये राहात असलेल्यांनाच तेथील भोजनकक्षात (रेस्टॉरंट) जाण्याची परवानगी आहे.