शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

Eknath Shinde Ayodhya : 'त्यांनी सत्तेसाठी वडिलांना दिलेलं वचन मोडलं', अयोध्येतून CM एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 5:03 PM

Eknath Shinde Ayodhya : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत रामललाचे दर्शन घेतले.

Eknath Shinde Ayodhya : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज रामललाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. भाजप आणि शिवसेनेची विचारधारा एकच असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सर्व कार्यकर्ते 2 दिवसांपासून अयोध्येत उपस्थित आहेत, त्यांचे आभार. राममंदिर ही आपली श्रद्धा आहे. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाळासाहेब ठाकरे आणि करोडो भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

'काही लोकांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे'शिंदे पुढे म्हणाले की, अयोध्येचा विकास वेगाने होत आहे. हजारो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटणार आहे. काँग्रेसवर ताशेरे ओढत ते म्हणाले की, काही लोक आहेत, ज्यांना वेदनाही होत आहेत. त्यांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. स्वातंत्र्यानंतर काही लोक हिंदुत्वाबद्दल गैरसमज पसरवत होते, ते आजही करत आहेत. आमचे हिंदुत्व सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. हिंदुत्वामुळे राजकीय दुकाने बंद होतील, असे अनेकांना वाटते. मंदिर बांधणार पण तारीख सांगणार नाही, असे बोलणाऱ्या लोकांना पीएम मोदींनी मंदिर बांधून उत्तर दिले, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

'आम्ही जनतेच्या निकालाचे पालन केले'ते पुढे म्हणाले की, अभिमानाने बोला आपण हिंदू आहोत, हा नारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. शिवसेना आणि भाजपची विचारसरणी एकच आहे. जाणीवपूर्वक दिशाभूल करणारे मतभेद पसरवले गेले. 2019 मध्ये भाजपने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करावे, अशी जनतेची इच्छा होती. सत्तेच्या लालसेपोटी त्यांची दिशाभूल झाली, पण आम्ही 8 महिन्यांपूर्वी जनतेचा निर्णय योग्य ठरवला. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात होते असे सरकार आम्ही स्थापन केले. ही विचारधारा पुढे नेण्याण्यासाठी आम्ही अयोध्येत आलो आहोत. 

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाउद्धव ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू श्री रामाने 14 वर्षे वनवास भोगला. दुसरीकडे ज्या मुलाने जनता आणि आपल्या वडिलांना शब्द दिला होता, सत्तेसाठी तो शब्द मोडला. गेल्या 8-9 महिन्यांत जे निर्णय झाले, ते अनेक वर्षात घेतले गेले नाहीत. आमचे सरकार सर्वसामान्यांचे, कामगारांचे, विद्यार्थी, महिलांचे, गरीबांचे सरकार आहे. मी घरी बसणारा नाही तर शेतात काम करणारा मुख्यमंत्री आहे. आदेश देऊन एसीत बसणारा मी नाही, तर मी एक कार्यकर्ता आहे आणि जमिनीशी जोडलेला मुख्यमंत्री आहे. बाळासाहेबांनी कारसेवेत चांदीचे आसन मांडले होते, तेव्हापासून अयोध्येशी शिवसैनिकांचे नाते आहे. आमची अयोध्येवर श्रद्धा आहे, म्हणूनच आज आम्ही येथे आहोत, असेही ते म्हणाले

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAyodhyaअयोध्या