गुवाहाटी: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यानी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. शिंदे आपल्यासोबत जपळपासा 50 आमदार घेऊन गेल्याने सरकार अल्पमतात आहे. एकनाथ शिंदे आधी सूरतला आणि तेथून असामच्या गुवाहाटीला गेले. गुवाहाटीमधील हॉटेल 'रेडिसन ब्लू' मध्ये ते बंडखोर आमदारांसोबत राह आहेत. दरम्यान, या हॉटेलबाहेर विरोधकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
काल(27 जून) रोजी हॉटेलबाहेरील एका मोठ्या होर्डींगवर बंडखोरांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोंचे होर्डींग झळत होते. हे होर्डींग नंतर काढण्यात आले, पण आज राजधानी गुवाहाटीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नावाने फिल्मी स्टाइल बॅनर लावण्यात आले आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार हॉटेल ज्या परिसरामध्ये तिथेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बॅनरबाजीमधून बंडखोर शिवसेना आमदारांवर निशाणा साधला आहे. या बॅनरवर बाहुबली चित्रपटामधील दृष्य दिसत आहे. कटप्पाने बाहुबलीवर पाठीमागून वार केल्याचे दृष्य बॅनरवर लावण्यात आले आहे. "संपूर्ण देश गुवाहाटीमध्ये लपलेल्या गद्दारांकडे पाहत आहे. अशा खोट्या लोकांना जनता माफ करणार नाही,'' अशा ओळी यावर लिहिण्यात आल्या आहेत. यासोबतच, त्याच्या बाजूला गद्दार असा हॅशटॅग लिहिण्यात आलाय.