Eknath Shinde Shiv Sena : काल, म्हणजेच 9 जून रोजी मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यात मित्रपक्षातील खासदारांसह भाजपच्या अनेक खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, या शपथविधीनंतर एनडीएतील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. चिराग पासवान, जीतनराम मांझी आणि एचडी कुमारस्वामी यांच्या पक्षाला कमी जागा मिळून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले, पण आमच्या पक्षाचे सात खासदार असूनही फक्त एक राज्यमंत्रिपद दिले, असे पक्षाचे मुख्य व्हीप श्रीरंग बारणे यांचे म्हणने आहे.
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
श्रीरंग बारणे म्हणतात, 'आम्हाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. चिराग पासवान यांच्याकडे पाच खासदार, मांझी एक खासदार, जेडीएसकडे दोन खासदार आहेत, तरीही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. मग लोकसभेच्या 7 जागा मिळूनही शिवसेनेला एकच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) का? आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट लक्षात घेता आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवे होते,' असे म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवार गटही नाराज?शिंदे गटाने जाहीर नाराजी व्यक्त करण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित गटानेही मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, 'शपथविधीच्या आधी आम्हाला सांगण्यात आले होते की, आमच्या पक्षाला स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रिपद मिळेल. मी यापूर्वी केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होतो, त्यामुळे माझ्यासाठी कमी दर्जाचे पद घेणे योग्य वाटले नाही. आम्ही भाजप नेतृत्वाला कळवले की, आम्हाला कॅबिनेटमंत्रिपद हवे आहे, पण त्यांनी काही दिवस थांबण्यास सांगितले,' अशी माहिती पटेल यांनी दिली.
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ