नवी दिल्ली : एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर परिणाम झाल्याने भारतातील महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा पाऊस पुरेसा कोसळला नसल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस चांगला येईल, असे भाकीत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले होते. परंतु आतापर्यंत प्रत्यक्षात तेवढा पाऊस कोसळला नाही. महाराष्ट्रातील मुंबईत, पुणे व कोकण हे प्रदेश वगळता विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे विदर्भातील जवळपास अर्ध्याअधिक पेरण्याही होऊ शकल्या नाहीत. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. दिल्लीतही अद्यापही पावसाने पुरेशी हजेरी लावलेली नाही.हवामान तज्ज्ञांनी मान्सून वेळेवर येईल व पुरेसा येईल, असे भाकीत वर्तविल्यानंतर मान्सून गेला कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. या मागे एल निनो सामुद्रिक स्थितीबदलामुळे हे झाल्याचे एका हवामान संस्थेने म्हटले आहे.पूर्व व मध्य विषुववृत्तीय भागातील समुद्रामध्ये उष्ण पाण्याचा प्रवाह वाढल्याने भारतातील मान्सूनवर परिणाम झाल्याचा निष्कर्ष या अभ्यासात काढला आहे. एल निनोचा प्रभाव देशातील हवामान तज्ज्ञांनी मान्य केला आहे. या एल निनोच्या प्रभावाने देशात आतापर्यंत ३३ टक्के मोसमी पाऊस सरासरपेक्षा कमी कोसळला आहे.एल निनोचा प्रभाव सप्टेंबरपर्यंत राहील, असा अंदाज व्यक्त केला होता परंतु हवामान संस्थांनी मात्र आता एल निनोचा प्रभाव ओसल्याचे स्पष्ट केल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.भारतातील हवामान तज्ज्ञांनी एल निनोचा प्रभाव ओसरत असल्याचे सांगितले. ही भारतातील मोसमी पावसासाठी ‘गुड न्यूज’ असली तरी एल निनोचा प्रभावाचा परिणाम पूर्णपणे नाहीसा झाला, असे मानता येत नसल्याचे भारतीय हवामान खात्याचे प्रमुख डी. शिवानंद पै यांनी सांगितले. एल निनोचा प्रभाव कमी झाला तरी उर्वरित काळात मोसमी पाऊस पुरेसा येईल, याची शाश्वती नसल्याचेही या अहवालात स्पष्ट केले आहे.>काय आहे एल निनो?प्रत्येक २ ते ६ वर्षांच्या अंतराने पूर्व व मध्य विषुवृत्तीय प्रदेशातील समुद्रात सामान्यतेपेक्षा उष्ण प्रवाहाची निर्मिती होते. यामुळे हवेच्या प्रवाहांमध्ये बदलाचा परिणाम मान्सूनवर होतो. एल निनोमुळे भारतातील समुद्र व पठारांवर वाहणाºया मोसमी वाºयाचा प्रवाह प्रभावित होतो.
मोसमी पावसावर यंदा एल निनोचा घाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 4:27 AM