शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
3
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
4
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
5
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
6
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
7
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
8
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
9
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
10
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
11
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
12
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
13
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
14
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
15
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
16
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
18
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
19
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
20
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा

पत्नी-मुलाचा कारनामा! 'मी जिवंत आहे...' म्हणत 'तो' पुरावा घेऊन एसपी ऑफिसमध्ये पोहचला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 1:15 PM

एका व्यक्तीने आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी थेट एसपी ऑफिस गाठलं.

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी थेट एसपी ऑफिस गाठलं. या व्यक्तीच्या पत्नी आणि मुलाने त्याला मृत घोषित करून त्याचं खोटं मृत्यूपत्र बनवलं आणि सर्व संपत्ती आपल्या ताब्यात घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, चंकसेरिया येथील रहिवासी असलेल्य़ा सुरेंद्र यांच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला आहे. त्यांच्या पत्नीने सर्व जमीन मुलाच्या आणि स्वत:च्या नावावर करून घेतली आहे.  जिवंत असलेल्या पतीला मृत घोषित करून संपत्ती हडपणाऱ्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जेव्हा नवऱ्याला हा सर्व धक्कादायक प्रकार समजला तेव्हा त्याने न्यायासाठी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. आता तो न्याय मागत असून जिवंत असल्याचं सर्वांना सांगत आहे. सुरेंद्रने एसपी कार्यालयात पोहचून अधिकाऱ्यासमोर हजर होत आपण जिवंत असल्याचा पुरावा दिला. 

अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच पोलिसांना आता सुरेंद्र यांना वृद्धाश्रमात पाठवण्याची देखील व्यवस्था केली आहे. सुरेंद्र यांनी पत्नीचं गावातील एका व्यक्तीसोबत अफेअर असल्याचा आरोप केला आहे. यासोबतच त्यानेच आपल्या जमिनीवर कब्जा केल्याचं देखील म्हटलं आहे. पत्नी मारहाण देखील करायची. जेवायला द्यायची नाही असंही सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी