गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2015 12:15 AM
गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्नअकोला : सासर्याचा मृत्यू आणि पत्नीच्या गर्भपातास जबाबदार असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर करवाई करण्याच्या मागणीसाठी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या संपर्क कार्यालयात युवकाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. युवकावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संतोष भगत याचे सासरे प्रकाश अढाऊ हे २ एप्रिल रोजी अपघातात जखमी झाले. त्यांना सवार्ेपचार रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी उपचारास विलंब केल्याने, डॉक्टरांना जाब विचारला असता त्यांनी भगत यांच्या नातेवाईकांसोबत वाद घालून ४० ते ५० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना बोलावून घेतले. नातेवाईक व डॉक्टरांमध्ये वाद वाढून प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी भगत यांची गर्भवती पत्नी कल्पना भगत हिला व नातेवाईकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. दरम्यान, भगत यांचे सासरे प्रकाश अढाऊ यांचा मृत्यू झाला. पत्नीला मारहाण झाल्याने तिचाही गर्भपात करावा लागला. दुसरीकडे पोलिसांनी मात्र संतोष भगत व त्यांच्या नातेवाइकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर मालमत्ता नुकसान कायद्यानुसार गुन्हे दाखल केले; परंतु त्यांना अटक केली नाही. सासर्याच्या मृत्यूस आणि पत्नीच्या गर्भपातास कारणीभूत ठरलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतोष भगत यांनी केली होती. त्यानंतर भगत यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याकडे तक्रारी केल्या़ परंतु कारवाई होत नसल्याने अखेर संतोष भगत यांनी पालकमंत्री पाटील यांच्या संपर्क कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब तेथे उपस्थित असलेले भाजपा कार्यकर्ते व भगत यांच्या नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला सवार्ेपचार रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)