निवडून आले... पण अर्ध्याहून अधिक आमदार ‘गुन्हे’ असलेले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 10:59 AM2023-05-16T10:59:06+5:302023-05-16T11:00:06+5:30
सर्वाधिक ४२ गुन्हे बेल्लारीचे काँग्रेसचे आमदार बी. नागेंद्र यांच्यावर दाखल आहेत. या आमदारांनी उमेदवारी दाखल करताना भरलेल्या प्रतिज्ञापत्रातूनच ही माहिती उपलब्ध झाली आहे.
चंद्रकांत कित्तुरे -
कोल्हापूर : कर्नाटक विधानसभेच्या नव्या सभागृहात २२४ पैकी ५५ टक्के म्हणजेच १२२ आमदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यातील ७१ आमदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात सर्वच पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. सर्वाधिक ४२ गुन्हे बेल्लारीचे काँग्रेसचे आमदार बी. नागेंद्र यांच्यावर दाखल आहेत. या आमदारांनी उमेदवारी दाखल करताना भरलेल्या प्रतिज्ञापत्रातूनच ही माहिती उपलब्ध झाली आहे.
किती आमदारांवर ५ ते १० गुन्हे? -
- १२२पैकी १२ आमदार हे पाच ते दहा या दरम्यान गुन्हे दाखल असलेले आहेत.
- यामध्ये डॉ. एच. डी. रंगनाथ, एच. डी. कुमारस्वामी, एम. बी. पाटील, एम. टी. कृष्णाप्पा, मुनीरत्ना, प्रियांक खरगे, राजा वेंकटप्पा नाईक, संतोष लाड, टी. बी. जयचंद्रा, ईश्वर खंड्रे, करीअम्मा आणि विनय कुलकर्णी यांचा समावेश आहे.
- महिला आमदार किती : १० (५%)
- विजय उमेदवारांची सरासरी संपत्ती ६४.३९ कोटी