ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - उत्तरप्रदेश पाचव्या टप्यातीन मतदानानंतर राजकीय आरोप-प्रत्योप थंडावले आहेत. प्रचारावेळी भाजपा, काँग्रेस-सपा आणि बसपा यांनी जोरदार प्रचार केला. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणला लावली आहे. अखिलेश यादवने आपली सत्ता वाचवण्यासाठी काँग्रसेबरोबर युती केली आहे. तर मायावती आपल्या बसपाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी लढत आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकांच्या निमित्ताने सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाला रोज नविन वळण मिळतं आहे. समोरच्या पक्षातील नेत्यावर कुरघोडी आणि टीका करताना नेत्यांनी अनेक वादग्रस्त आणि बेताल वक्तव्यं केली आहेत. त्यापैकी काही वक्तव्यं खालीलप्रमाणे आहेत.
कसाब वरुन वादंग - - उत्तर प्रदेशचा विकास हा या कसाबमुळेच थांबला आहे. या कसाबला उत्तर प्रदेशमधून बाहेर हाकलून द्या, असं म्हणत कसाब या शब्दाची फोडणी करताना अमित शाह म्हणाले होते, क म्हणजे काँग्रेस, स म्हणजे समाजवादी पार्टी आणि ब म्हणजे बहुजन समाज पार्टी आहे. अमित शहा यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतान बसपा प्रमुख मायावती यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका करताना अमित शहाच उत्तरप्रदेशचे खरे कसाब आहेत.
- जे विकास कार्य उत्तर प्रदेशाचा मुलगा (अखिलेश यादव) करुन शकला नाही, ते काम त्यांचा दत्तक पुत्र (पंतप्रधान नरेंद्र मोदी) करेल - मोदी- प्रत्येक मृत व्यक्तीला अग्नी द्यावा - साक्षी महाराजवादग्रस्त वक्तव्यामुळे सत्त चर्चेत असणारे साक्षी महाराज यांनी आज कोणत्याही मृत व्यक्तीला दफन करण्याची गरज नाही भारतातीस प्रत्येक मृत व्यक्तीला अग्नी द्यावा असे वादग्रस्त विधान करत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारतात प्रत्येक मृत व्यक्तीला हिंदू रितरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात यावे असे साक्षी महाराज म्हणाले.
- गाढवापासूनच प्रेरणा घेतो हे मी गर्वाने सांगतो. मी देशासाठी गाढवाप्रमाणे काम करत असून देशातील १२५ कोटी जनता माझे मालक आहेत. गाढव हा प्रामाणिक असतो. गाढव दिलेले काम नेहमी पूर्ण करतो असे मोदींनी म्हटले होते.
कब्रस्तानवरुन चिखलफेक -- एखाद्या गावात कब्रस्तान तयार केले जाणार असेल, तर तेथे स्मशानभूमीही तयार केली पाहिजे. जर रमजानमध्ये वीज मिळत असेल, तर दिवाळीतही ती मिळायला हवी. जर होळीला वीज मिळत असेल, तर ती ईदच्या दिवशीही मिळाली पाहिजे. भेदभाव व्हायला नको - पंतप्रधान नरेंद्र मोदीपंतप्रधानांच्या विधानांचा समाचार घेताना अखिलेश म्हणाले की, ते (मोदी) कब्रस्तान आणि स्मशानाची भाषा करीत आहेत. आम्ही मात्र लॅपटॉप आणि स्मार्टफोन जनतेला देण्याचे बोलत आहोत.
-आम्ही वाराणसीत २४ तास वीज देत आहोत. पंतप्रधान खोटी विधाने करुन लोकांची दिशाभूल करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी गंगा मातेची शपथ घेऊन उत्तर प्रदेशात वीज दिली जाते आहे की नाही, ते सांगावे, असे आव्हान अखिलेश यादव यांनी दिले आहे. - राम मंदिर नसेल तर विकास, रोजगार, शिक्षण कशालाच अर्थ नाही - विनय कटियार, भाजपा नेते