शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

UP Election 2017 : उत्तर प्रदेशचा कौल कोणाच्या पारड्यात?

By admin | Published: March 09, 2017 4:46 AM

उत्तर प्रदेश विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यात बुधवारी शांततेत मतदान झाले. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो कोणाला विजेचा झटका बसणार?

-  हरिश गुप्ता, नवी दिल्ली

उत्तर प्रदेश विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यात बुधवारी शांततेत मतदान झाले. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो कोणाला विजेचा झटका बसणार? बराच काळ उत्तर प्रदेशातील राजकारणात भाजपाचा विचारच केला जायचा नाही. परंतु यंदा त्याने समाजवादी पक्षाच्या ताब्यातून सत्ता हिसकावून घेण्यासाठी फार मोठे प्रयत्न केले आहेत. लोकसभा निवडणुकीत ४२ टक्के मिळवून ८० पैकी ७३ जागा जिंकून भाजपाने विरोधकांना धडकीच भरवली होती. असाच विजय शनिवारीही रूपांतरीत झाला तर भाजप ४०३ जागांपैकी ३२८ जागी आघाडीवर असेल. पण २०१७ हे वर्ष मोदी-शाह यांच्यासाठी २०१४ सारखे नाही. लोकसभा निवडणुकीत १९ टक्के मुस्लिमांची मते खात्रीची होती आता मात्र मुस्लिम भाजपच्याविरोधात आक्रमक होते व त्यांनी व्यूहरचनेनुसार मतदान केले आहे हे उघड गुपित आहे. दोन टक्के असलेल्या जाटांनी भाजपच्या पराभवासाठी त्वेषाने काम केले. २१ टक्के मतदार हे अनुसूचित जातींचे असून त्यातील ११ टक्के मते ही जाटवांची आहेत. जाटव बहुजन समाज पक्षाच्या (बसप) मागे ठामपणे उभे आहेत. राज्यात ओबीसी मते ४० टक्के असून, त्यात ९ टक्के यादवांचा समावेश आहे. ही यादव मते समाजवादी पक्षाशी एकनिष्ठ आहेत. वैश्य मते २ टक्के असून नोटाबंदीमुळे त्यांचा भाजपवर राग आहे. जवळपास ४० टक्के मते आपल्या विरोधात असल्याची जाणीव भाजपा नेत्यांना आखाड्यात उतरताना होती. राहिलेल्या ६० टक्के मतांतील प्रत्येक मतासाठी भाजपने प्रयत्न केला. बऱ्याच वर्षानंतर राज्यात तीन पक्षांत लढत झाली आहे. यापूर्वी ती लढत बसप-समाजवादी पक्ष अशी असायची. सपा व काँग्रेसने युती केली त्यामुळे भाजप व बसप यांना मग आपापली जागा शोधणे भाग पडले व त्यामुळे ही विधानसभेची निवडणूक तिरंगी बनली. सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला किमान ३३ ते ३४ टक्के मते मिळवावी लागतील. सपा व बसपा अल्पसंख्याकांच्या मतांसाठी संघर्ष करीत असताना भाजपने आपले सगळे लक्ष कुर्मी (३.५ टक्के), लोध (२.५ टक्के) मल्लाह (२ टक्के), तेली (२ टक्के), गदरियाज (२ टक्के), कुंभार (२ टक्के) आणि यादवांचा द्वेष करणाऱ्या इतर २० टक्के उपजातींवर केंद्रीत केले होते. मोदी यांनी यादवविरोधी भावनांचा पुरेपूर लाभ घेतला. सपा, बसपाने मुस्लिमांच्या बाजुने प्रचार केल्यामुळे भाजपाने ब्राह्माण, राजपूत, भुमिहार आदी १८ टक्के असलेल्या उच्चजातींना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. बनियांनाही आपलेले करण्यासाठीही प्रयत्न केले. नोटाबंदीमुळे दुखावलेल्या बनियांना शांत केले. मोदी यांनी निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांत जे प्रयत्न केले त्याचा आमच्यावर विपरीत परिणाम झाला, हे भाजपच्या विरोधकांनी मान्य केले आहे. बिहारमध्ये नितीशकुमारांच्या विरोधात भाजपला काही मुद्दा हाती लागला नाही. परंतु ती परिस्थिती उत्तर प्रदेशात नाही.निकालाबाबत मत वेगळेमुंबई, दिल्ली, गुजरात व मध्य प्रदेश या चार सट्टा बाजारांनीही यूपीत भाजपाला बहुमत वा सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे. काही सट्टेबाजांच्या मते भाजपाला त्या राज्यात २५0 हून जागा मिळू शकतील. मात्र जाणकारांच्या मते यूपीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. आयोगाच्या आदेशामुळे बुधवारी निवडणुकोत्तर जनमत चाचणीचे निकाल जाहीर झाले नाहीत. ते गुरुवारी जाहीर होतील.