हैदराबाद : 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आयोध्येत राम मंदिर बांधकामाला सुरुवात केली जाईल असे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा राम मंदिरचा मुद्दा घेऊन निवडणुकीत उतरणार हे स्पष्ट आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपाने राम मंदिर आयोध्येत बांधू असे अश्वासन दिले होते. काल हैदराबादमध्ये आमित शाह यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राम मंदिर 2019 च्या निवडणुकीपूर्वी बांधण्यास सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले.
सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राम मंदिर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. काल झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यासाठी योग्य ती पावले उचललेली जाणार अस्लयाचे स्पष्ट केले आहे.
भाजपा नेते पी. शेखर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तेलंगणा राज्याच्या भाजपा कार्यलयात ही बैठक पार पडली. आतापर्यंत राम मंदिर वादविवादाच्या गोष्टीचा क्रम पाहिला तर 2019 च्या निवडणुकीपूर्वी बांधकामास सुरुवात होऊ शकते असे शाह यांनी बैठकीत सांगितले.
'जे लोक राम जन्मभूमी आंदोलनाला विरोध करायचे, त्यांच्या तोंडून आता मंदिराचा विषय निघतो. हा एक कट असू शकतो. त्यामुळे आपण सतर्क राहायला हवं, थोडे दिवस धीर धरा, अयोध्येत राम मंदिर नक्की होईल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होते. आदित्यनाथ यांनी संत समुदायाला धीर बाळगण्याचं आवाहन केलं. काही दिवस संयम बाळगा. प्रभू रामाची कृपा झाल्यावर राम मंदिराची उभारणी होईल, असं आदित्यनाथ यांनी म्हटलं होते.