उत्तर प्रदेश विधानसभा निवडनुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यानंतर आता भाजपनेही आज आपल्या उमेदवारांची यादी जहीर केली. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्या जागाही जाहिर झाल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहारतून तर केशव प्रसाद मौर्य कौशाम्बिच्या सिराथू मतदार संगतून निवारणूक लाढणार आहेत. योगी आदित्यनाथ हे गोरखपूरमधून निवडनूक लढवणार असल्याची घोषणा होताच, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 'भाजपने त्यांना अधिकच घरी पाठवाले', असा टोमणा अखिलेश यांनी लगावला आहे. (UP Election 2022)
भाजपने बाबांना घरी पाठवले... -अखिलेश यादव म्हणाले, भाजपने बाबांना घरी पाठवले आहे. मुख्यमंत्र्यांनी कधी अयोध्या, कधी मथुरा, कधी देवबंद तर कधी प्रयागराजचे नाव सांगितले, पण भाजपने त्यांना आधीच घरी पाठवले आहे. आता मुख्यमंत्र्यांना गोरखपूरहून परत येण्याची गरज भासणार नाही. जे मुख्यमंत्री गोरखपूरमध्ये मेट्रो चालवू शकले नाही, सीवर लाइन टाकू शकले नाही, ज्यांनी वीज महाग केली, त्यांच्याकडून जनता काय अपेक्षा करणार, असा टोलाही यावेळी अखिलेश यादव यांनी लगावला. याच बरोबर समाजवादी पक्ष गोरखपूरमधून सर्वच्या सर्व जागा जिंकेल, असा दावाही अखिलेश यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपच्या कुण्याही बंडखोर मंत्र्याला अथवा आमदाराला आता पक्षात घेणार नाही - आता मी माझ्या पक्षात भाजपचा कुण्याही बंडखोर मंत्री अथवा आमदार घेणार नाही. भाजप वाटेल त्यांची तिकीटे कापू शकते. ते म्हणाले, मी पक्षाच्या अनेक तिकिटांचा त्याग केला आहे. याचबरोबर गोरखपूरमधील सर्व जागा समाजवादी पक्ष जिंकेल, असा दावाही अखिलेश यांनी केला. एवढेच नाही तर, 80 टक्के जनता आमच्यासोबत आहे, भाजपचा सफाया होईल. रावण यांनी सपाशी बोलल्यानंतर गाझियाबाद आणि मनिहारनच्या जागा दिल्या आहेत. रावण यांनी कुणाला तरी फोन केला आणि सांगितले, की मी निवडणूक लढू शकत नाही. आजनंतर डॉ.राधामोहन दास अग्रवाल यांच्या शिवाय कुणालाही पक्षात स्थान दिले जाणार नाही, असेही अखिलेश यादव म्हणाले.