'RSS धोकादायक का?' UP काँग्रेस प्रवक्ता होण्यासाठी 45 मिनिटांचा पेपर, विचारण्यात आले असे प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 05:09 PM2021-12-22T17:09:01+5:302021-12-22T17:10:29+5:30
45 मिनिटांच्या या पेपरमध्ये RSS धोकादायक का आहे? 2009 मध्ये काँग्रेसने किती जागा जिंकल्या होत्या? अशा प्रश्नांचा समावेश आहे. या पेपरमध्ये 20 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह, तर दोन 2 प्रश्न विश्लेषणात्मक आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस प्रवक्ता होणे आता सोपे राहिलेले नाही. काँग्रेसने प्रवक्त्या होण्यासाठी परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे आणि ही परीक्षा अत्यंत प्रोफेशनल करण्यात आली आहे. मात्र या परीक्षेतील विचारण्यात आलेले प्रश्न परीक्षा देण्यासाठी आलेल्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरले आहेत.
45 मिनिटांच्या या पेपरमध्ये RSS धोकादायक का आहे? 2009 मध्ये काँग्रेसने किती जागा जिंकल्या होत्या? अशा प्रश्नांचा समावेश आहे. या पेपरमध्ये 20 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह, तर दोन 2 प्रश्न विश्लेषणात्मक आहेत.
UP प्रवक्ता होण्यासाठी काँग्रेस विचारतेय असे प्रश्न -
- उत्तर प्रदेश विधानसभेत किती जागा आहेत?
- उत्तर प्रदेशात किती ब्लॉक आणि क्षेत्र आहेत?
- योगी सरकार अपयशी का मानले जात आहे?
- RSS संघटना धोकादायक का आहे?
- उतर प्रदेशात किती लोकसभा आणि विधानसभा जागा आहेत.
- 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसने किती जागा जिंकल्या आहेत?
- लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात किती जागा आरक्षित आहेत?
- मनमोहन सरकार का चांगले होते आणि त्याच्या अचिव्हमेंट्स काय?
काँग्रेसचे प्रवक्ता अंशू अवस्थी यांनी म्हटल्याप्रमाणे, संपूर्ण राज्यात प्रवक्ता पदासाठी परीक्षा घेतली जात आहे. यासाठी उमेदवारांकडून एक फॉर्मदेखील भरून घेतला जात आहे. यात, उमेदवाराचे नाव, जन्म तारीख, शिक्षण, मोबाइल नंबर, ईमेल आयडी भरून घेतली जात आहे. एवढेच नाही, तर यात उमेदवाराच्या फेसबूक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामचीही माहिती विचारण्यात आली आहे. 75 जिल्ह्यांत आतापर्यंत 2850 जणांनी ही परीक्षा दिली आहे.