निवडणूक आयोगानं (Election Commission) शनिवारी निवडणुकीच्या प्रचारासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या. यानुसार आता पदयात्रेवर घालण्यात आलेली बंदी हटवण्यात आली आहे. तसंच प्रचाराचा कालावधी दोन तासांनी वाढवण्यात आलाय. राजकीय पक्ष आणि सर्व उमेदवार सर्व नियमांचं पालन करत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करू शकतात.
निवडणूक प्रचारासाठी वेळेची मर्यादा शिथिल करताना आयोगाने स्थळाच्या क्षमतेनुसार रॅलींनाही परवानगी दिली आहे. तसंच निवडणूक आयोगानं मतदान असलेल्या राज्यांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचं सांगत निर्बंध शिथिल केले. "केंद्रीय आरोग्य सचिवांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट दिसून आली आहे आणि देशातही कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे," असं त्यांनी सांगितलं.