नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्धचा वाराणसी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज रद्द करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका फेटाळणाºया अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने दाखल केलेल्या अपिलावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन आठवडे स्थगित केली.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सीमा सुरक्षा दलातील बडतर्फ जवान तेजबहादूर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद ठरविला होता. त्याविरुद्धचे तेजबहादूर यांचे अपील अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. या निर्णयास तेजबहादूर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.एक याचिका फेटाळताच दुसरीवाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी तेजबहादूर यांनी दाखल केलेला नामांकन अर्ज फेटाळण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयास आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ९ मे रोजी फेटाळून लावली होती. याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले होते की, याचिकेवर विचार करण्यासाठी कोणताही आधार आपल्याला दिसून येत नाही.ही याचिका फेटाळल्यानंतर तेजबहादूर यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली.सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. ऋषिकेश राय यांच्या पीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बडतर्फ जवान तेजबहादूर यांच्या वकिलाने दाखल केलेल्या अर्जाचे अवलोकन केले. या पत्रात सुनावणी चार आठवड्यांसाठी स्थगित करण्याची विनंती करण्यात आली होती.त्यावर न्यायालयाने सांगितले की, हे प्रकरण दोन आठवड्यांनंतर सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात यावे. याप्रकरणी मोदी यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे आणि सत्यपाल जैन यांनी बाजू मांडली. तेजबहादूर यांनी आपल्या अपिलात मोदी यांना एक प्रतिवादी बनविले आहे.
मोदींविरोधातील निवडणूक : ‘त्या’ जवानाच्या अर्जावर सुनावणी स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 4:41 AM