२८५ कोटी रुपये: फ्युचर गेमिंगने तृणमूलला दिले
द्रमुकला मोठी देणगी देणाऱ्या फ्युचर गेमिंग या कंपनीने भाजपला ५० कोटी रुपये, वायएसआर काँग्रेसला १५० कोटी रुपयांची देणगी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून दिली आहे. या कंपनीने तृणमूल काँग्रेसला ऑक्टोबर २०२२पर्यंत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून २८५ कोटी रुपयांची देणगी दिली होती, असे निवडणूक आयोगाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीवरून दिसून येते.
३८५ कोटी रुपये: क्वीक सप्लायने भाजपला तर शिवसेनेला २५ कोटी दिले
क्वीक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड या फारसे कोणाला माहीत नसलेल्या व नवी मुंबईतील धीरुभाई अंबानी नॉलेज सिटीतील नोंदणीकृत पत्ता असलेल्या कंपनीने भाजपला ३९५ कोटी रुपये व शिवसेनेला २५ कोटी रुपये दिल्याचे उघड झाले आहे. देणगीदारांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती रुपयांची देणगी दिली याची स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेली माहिती निवडणूक आयोगाने गुुरुवारी आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना सर्वाधिक देणग्या देणाऱ्यांमध्ये क्वीक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा तिसरा क्रमांक लागतो. ही कंपनी वेअरहाऊसेस व स्टोअरेज युनिट बनविण्याचे काम करते. ही कंपनी आपल्याशी संबंधित नाही असे रिलायन्सने याआधीच स्पष्ट केले आहे.