पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर; 11 डिसेंबरला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 03:38 PM2018-10-06T15:38:52+5:302018-10-06T16:23:02+5:30
मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
नवी दिल्ली: निवडणूक आयोगानं पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 28 नोव्हेंबरला मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला निवडणूक होईल. छत्तीगसडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 12 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होईल. या पाचही राज्यांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. या सर्व राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत दिली.
Counting of votes to be done on 11 December for Madhya Pradesh, Chhattisgarh, Mizoram, Rajasthan and Telangana state assembly elections. pic.twitter.com/j7NZgah45m
— ANI (@ANI) October 6, 2018
Phase 1 voting for state assembly election in #Chhattisgarh to take place on 12 November, voting for phase 2 on 20 November. pic.twitter.com/oHeIWgwdGT
— ANI (@ANI) October 6, 2018
छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 12 नोव्हेंबरला होईल. यासाठी 23 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर आहे. या टप्प्यात 18 विधानसभा मतदारसंघात मतदान होईल. तप उर्वरित जागांवर 20 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येईल. मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. 28 नोव्हेंबर रोजी या दोन्ही राज्यांमधील नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील.
Madhya Pradesh and Mizoram assembly elections to be held on 28th November. pic.twitter.com/nyAlPWoLc6
— ANI (@ANI) October 6, 2018
राजस्थान आणि तेलंगाणातदेखील एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 7 डिसेंबरला या दोन्ही राज्यांमध्ये मतदान होईल. या सर्व राज्यामध्ये 11 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. या पाचही राज्यांमध्ये मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अशा आहेत मतदानाच्या तारखा:
छत्तीसगड- पहिला टप्पा- 12 नोव्हेंबर (18 जागांसाठी मतदान)
त्तीसगड- दुसरा टप्पा- 20 नोव्हेंबर (72 जागांसाठी मतदान)
मध्य प्रदेश आणि मिझोरम- एकच टप्पा- 28 नोव्हेंबर
राजस्थान आणि तेलंगणा- एकच टप्पा- 7 डिसेंबर
सर्व राज्यांमध्ये मतमोजणी- 11 डिसेंबर
Rajasthan and Telangana assembly elections to be held on 7th December pic.twitter.com/fVUaeZxCVS
— ANI (@ANI) October 6, 2018