शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

निवडणूक आयोगाने असे शोधले देशातील पहिल्या मतदाराला; निवासस्थानी केला सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 4:05 AM

भारत स्वतंत्र झाल्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकांत (१९५१) हिमाचल प्रदेशमधील किन्नोर येथून सर्वांत प्रथम मतदान केलेले श्यामसरन नेगी यांची प्रयत्नपूर्वक सारी माहिती मिळवून निवडणूक आयोगाने त्यांना शोधून काढले.

सिमला : भारत स्वतंत्र झाल्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकांत (१९५१) हिमाचल प्रदेशमधील किन्नोर येथून सर्वांत प्रथम मतदान केलेले श्यामसरन नेगी यांची प्रयत्नपूर्वक सारी माहिती मिळवून निवडणूक आयोगाने त्यांना शोधून काढले.देशातील पहिले मतदार असा बहुमान मिळविलेले नेगी १०२ वर्षांचे असून त्यांनी आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकांत आपला हक्क बजावला आहे. सुमारे ४५ वर्षे प्रसिद्धीच्या झोतापासून लांब असलेले नेगी आगामी लोकसभा निवडणुकांतही तितक्याच उत्साहाने मतदान करणार आहेत. किन्नोर मतदारसंघातील हिवाळा व होणारी हिमवृष्टी लक्षात घेऊन तिथे निवडणुकांत सर्वांतआधी मतदान घेतले जाते.हिमाचल प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विद्यमान अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा नंदा यांची जुलै २००७ साली किन्नोरच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्या वेळी मतदारयाद्या पाहताना त्यांना वयोवृद्ध श्यामसरन नेगी यांच्याविषयी माहिती मिळाली. त्यानंतर कल्पा गावात झालेल्या भेटीत आपण स्वतंत्र भारताचे पहिले मतदार आहोत, असे नेगी यांनी सांगताच नंदा यांनी ही माहिती निवडणूक आयोगाला कळवली. मनीषा नंदा यांनी स्थानिक स्तरावर तसेच निवडणूक आयोगाने आपल्या मुख्यालयातील दस्तावेज तपासून नेगी यांचे म्हणणे खरे असल्याचा निर्वाळा दिला. नेगींना शोधून काढणे हा अनुभव मला एखादी पीएच.डी. मिळविण्यासारखाच होता असे मनीषा नंदा म्हणाल्या. त्यानंतर २०१२ साली तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी श्यामसरन नेगी यांची कल्पा गावातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला.२०१४ च्या लोकसभा निवडणुकांत मतदानाला प्रोत्साहन देण्याकरिता गुगलने नेगींवर खास व्हिडीओफीतही बनविली होती. नेगी आतासाऱ्या देशाचे आकर्षण बनले असून त्यांचा मतदानाबद्दलचा उत्साहही वाखाणण्यासारखा आहे. (वृत्तसंस्था)असे केले प्रथम मतदानश्यामसरन नेगींचा जन्म १ जुलै १९१७ रोजी झाला. ते एका सरकारी शाळेत शिक्षक होते. पहिल्या लोकसभा निवडणुकांत त्यांना निवडणुकीच्या कामावर नेमण्यात आले होते. त्या वेळी किन्नोर केंद्रातून मतदान करू देण्याची नेगींनी केलेली विनंती तेथील अधिकाऱ्याने मान्य केली. त्यानुसार नेगींनी मतदान केले व ते देशातील पहिले मतदार ठरले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक