'नीती'ला निवडणूक आयोगाची नोटीस; काँग्रेसचा टाळे ठोकण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 10:00 PM2019-03-29T22:00:53+5:302019-03-29T22:02:37+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक अजेंड्यावर आज भाष्य केले. यावेळी त्यांनी या अजेंड्यामध्ये योजना एका व्यक्तीची नाही, तर जनतेचा आवाज असणार असल्याचे सांगितले.
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी किमान उत्पन्न योजना जाहीर करत निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. मात्र, यावर नीती आयोगाने केलेल्या टीकेविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यावर आयोगाने नीती आयोगाला नोटीस पाठविली आहे. तर राहुल गांधी यांनी ही न्याय योजना जनतेचा आवाज असून सत्तेत आल्यानंतर नीती आयोगावाच टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक अजेंड्यावर आज भाष्य केले. यावेळी त्यांनी या अजेंड्यामध्ये योजना एका व्यक्तीची नाही, तर जनतेचा आवाज असणार असल्याचे सांगितले. यामध्ये रोजगाराभिमुख, शेती संकट दूर करण्यासाठी तसेच आरोग्य, शिक्षणासह अर्थव्यवस्था मजबूत करण्यासंबंधी घोषणा असणार असल्याचे सांगितले. तसेच न्याय योजनेवर टीका करणाऱ्या नीती आयोगालाही सत्तेत आल्यास बंद करणार असल्याचे ते म्हणाले.
तर दुसरीकडे काँग्रेसवर टीका करणाऱ्या नीती आयोगाच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली असून राजीव कुमार यांनी देशाबाहेर असल्याने यासाठी 5 एप्रिलपर्यंतचा वेळ मागितला आहे.
Rajiv Kumar, Vice Chairman, NITI Aayog was given a notice by Election Commission over his remarks against the Congress’ poll promise of minimum income guarantee https://t.co/IQa9sLzhUc
— ANI (@ANI) March 29, 2019
राहुल गांधी हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी उद्योजकांना कर दहशतवादातूनही मुक्त करणार असल्याचे सांगितले.
राहुल गांधी यांनी ट्विट करत सत्तेत आल्यानंतर नीती आयोगाला बंद करण्यात येईल. या बदल्यात योजना आयोगाला आणण्यात येईल, ज्यामध्ये प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, विशेषज्ञ असतील. यांची संख्या 100 पेक्षा कमी असेल. नीती आयोगाकडे कोणतेही काम नाही. यामुळे ते सरकारच्या प्रचारासाठी खोटी आकडेवारी देत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना आयोग बंद करून नीती आयोग सुरु केला होता.