राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावरुन टीका करताना राहुल गांधी म्हणाले, भारतीय टीम विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, पण पनौतीमुळे त्यांना हरवले, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर केली. यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. दरम्यान, आता हे टीका राहुल गांधींना भोवणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने गांधी यांना नोटीस पाठवली आहे.
देशात पाच राज्यांच्या निवडणुका, पण नेदरलँडच्या निकालाचीच चर्चा; कट्टर नेत्याची सत्ता
निवडणूक आयोगाने २५ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राहुल गांधी यांच्याकडून उत्तरे मागवली आहेत. भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल कारवाईची मागणी केली होती.
वागणुकीविरोधात योग्य कायदेशीर कारवाई करून निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि या दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे भाजपने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आदेश पारित केला पाहिजे. अन्यथा निवडणुकीचे वातावरण बिघडेल आणि एखाद्या सन्माननीय व्यक्तीची बदनामी करण्यासाठी असभ्य, आक्षेपार्ह भाषा आणि बनावट बातम्यांचा वापर थांबवणे कठीण होईल, असंही यात म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी माफी मागावी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेले अपमानास्पद विधान अत्यंत अस्वीकार्य असून त्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे पोहोचलेल्या शिष्टमंडळात भाजपचे मुख्यमंत्री राधामोहन दास अग्रवाल, ओम पाठक आणि इतर नेत्यांचा समावेश होता. भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात लज्जास्पद वक्तव्य करून त्यांचे खरे रूप दाखवले आहे.