नवी दिल्ली - भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM मशीन आपण हॅक केल्या होता असा दावा एका अमेरिकन हॅकरने केल्याने भारतीय राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र भारतीय निवडणूक आयोगाने या हॅकरने केलेला दावा फेटाळून लावला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणात पडू इच्छित नाही. भारतातील EVM सुरक्षित आहेत, त्यांमध्ये छेडछाड होऊ शकत नाही, या दाव्यावर आम्ही कायम आहोत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. लंडनमध्ये झालेल्या एका हॅकेथॉनमध्ये भारतातील EVM आपण हॅक केल्याचा दावा एका हॅकरने केला होता. 2014 साली भाजपाने तर 2015 साली आम आदमी पक्षाने EVM हॅक करून निवडणुका जिंकल्या, असा दावा या हॅकरने केला होता. मात्र निवडणूक आयोगाने हे वृत्त फेटाळले आहे.