नवी दिल्ली - गुरुवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वेळी सर्वप्रथम व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी करून त्याची ईव्हीएममधील मतांशी जुळणी करण्याची विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत आज बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आता गुरुवारी नियोजित वेळापत्रकानुसारच मतमोजणी होणार आहे. आज निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडांसह निवडणूक आयुक्त अशोक लवासा हेसुद्धा उपस्थित होते. विरोधी पक्षांची मागणी मान्य केली तर मतमोजणीसाठी दोन ते तीन दिवसांचा अवधीही लागू शकतो, याचीही चर्चा या बैठकीत झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांची व्हीव्हीपॅटबाबतची मागणी फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 1:49 PM