शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

निवडणूक आयुक्तांचा निर्णय पंतप्रधानांना खूश करण्यासाठी, आम आदमी पार्टीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 3:42 AM

मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार जोती यांना निवृत्तीपूर्वी सारे प्रलंबित दावे निकाली काढण्याची घाई झाली आहे, असा आरोप आपतर्फे करण्यात आला.

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार जोती यांना निवृत्तीपूर्वी सारे प्रलंबित दावे निकाली काढण्याची घाई झाली आहे, असा आरोप आपतर्फे करण्यात आला. जोती २२ जानेवारी रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण होत निवृत्त होत आहेत. या याचिकेत आमदारांची बाजू आयोगाने ऐकुन घेतली नाही. सबब लाभाचे पद याचिकेचा निर्णय आयोगाने नव्हे, तर न्यायालयाने घेणे उचित ठरेल, असेही आपने म्हटले आहे. तसेच आयोगाच्या या निर्णयाला आपतर्फे न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे सांगण्यात आले.२१ आमदारांच्या नियुक्त्यांना आव्हान देणाल्या रवींद्र कुमार यांच्या याचिकेवर निकाल देताना दिल्ली हायकोर्टाने ८ सप्टेंबर २0१६ रोजी विधानसभेचे सदस्य असताना हे २१ जण कोणतेही लाभाचे पद स्वीकारू शकत नाहीत. सबब २१ आमदारांचे संसदीय सचिवपद रद्द करीत आहोत, असे स्पष्ट केले. तेव्हापासून संसदीय सचिवपदी हे आमदार नाहीत. मात्र १३ मार्च १५ ते ८ सप्टेंबर १६ पर्यंत ते संसदीय सचिव होते, हे गृहित धरून आयोगाने २१ आमदारांना नोटीस बजावली. दरम्यान आ. जरनैलसिंग यांनी पंजाब विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी राजीनामा दिला त्यामुळे हे प्रकरण २0 आमदारांपुरते मर्यादित राहिले. आमदारांच्या नियुक्त्या वादग्रस्त ठरत असल्याने केजरीवाल सरकारने २३ जून २0१५ रोजीलाभाचे पदविषयक कायद्यातबदल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करवून घेतले आणि दुसºयाच दिवशी ते नायब राज्यपालांकडे त्यांनी ते राष्ट्रपतींकडे पाठवले आणि राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाचेमत मागवले. आयोगाने याचिका दाखल करणाºया वकिलांनाआपला जबाब दाखल करण्यास सांगितले. त्यावर विधानसभेने असंवैधानिक पध्दतीने विधेयक मंजूर केल्याचा आरोप अ‍ॅड पटेल यांनी केला. त्यांच्या उत्तराशी सहमत असल्याचे आयोगाने राष्ट्रपतींना कळवले. त्याला अनुसरून राष्ट्रपतींनी विधेयक पुन्हा दिल्ली सरकारकडे पाठवले. हायकोर्टाच्या निकालाच्या बºयाच आधी हे घडत होते.राज्यघटनेच्या अनुच्छेद १0२ (१) (अ) नुसार खासदार वा आमदाराला पगार, भत्ते, व अन्य सुविधा मिळणारे अन्य पद स्वीकारता येत नाही.घटनेतील अनुच्छेद १९१ (१)(अ) व लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातील कलम ९ (अ) मधेही हाऊस आॅफ प्रॉफिट कलमान्वये खासदार अथवा आमदारांना लाभाचे अन्य पद स्वीकारण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर, दिल्ली हायकोर्टाने संसदीय सचिवपद रद्दच केले असल्याने अ‍ॅड. पटेलांच्या याचिकेवर आयोगाने सुनावणी घेण्याचे औचित्यच नाही, असे नमूद करीत याचिका रद्द करण्याची विनंती या आमदारांनी केली. ‘आप’च्या आमदारांची ही याचिका आयोगाने फेटाळली, मात्र पटेलांच्या याचिकेची सुनावणी चालू राहील, असे नमूद केले. अखेर निवडणूक आयोगाने शुक्रवारी आपच्या २0 आमदारांबाबत निर्णय घेतला व आपल्या शिफारसी शुक्रवारी राष्ट्रपतींकडे पाठवून दिल्या.आयोगाने आपल्या शिफारशीत जर २0 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केल्याचे सांगण्यात येते, त्यात आदर्श शास्त्री (द्वारका), अलका लांबा (चांदनी चौक), संजीव झा (बुराडी), कैलाश गहलोत (नजफगड), विजेंद्र गर्ग (राजेंद्र नगर), प्रवीणकुमार (जंगपुरा ), शरदकुमार चौहान (नरेला),मदनलाल खुफिया (कस्तुरबा नगर),शिवचरण गोयल (मोती नगर),सरिता सिंह (रोहतास नगर), नरेश यादव (महरौली), राजेश गुप्ता (वजीरपूर), राजेश ॠषी (जनकपुरी), अनिलकुमार वाजपेयी (गांधी नगर), सोम दत्त(सदर बाजार), अवतार सिंह(कालकाजी), सुखवीरसिंग डाला (मुंडका),मनोज कुमार(राखीव), (कोंडली), नितीन त्यागी (लक्ष्मी नगर), जरनैलसिंग (राजौरी गार्डन) यांची नावे आहेत. 

टॅग्स :AAPआपBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी