लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रम किंवा प्रसंगात राजकीय पक्षांनी दिव्यांग व्यक्तींबद्दल अवमानकारक शब्द वापरू नयेत. राजकीय नेते, उमेदवारांनी काढलेल्या अशा उद्गारांमुळे त्यांनी दिव्यांग व्यक्तींचा अपमान केला आहे असे मानण्यात येईल, असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे.
आयोगाने म्हटले आहे की, निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व समुदायांचा सहभाग असणे लोकशाहीला अभिप्रेत आहे. दिव्यांग व्यक्तींबद्दल राजकीय पक्ष अवमानकारक भाषा वापरत असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही उमेदवाराने केलेली अशा प्रकारची वक्तव्ये वा लिखाण हा दिव्यांग व्यक्तींचा अवमान आहे. त्यामुळे अशा गोष्टी होणार नाहीत याची राजकीय पक्षांनी दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहन आयोगाने केले.
आयोगाने म्हटले की, राजकीय पक्ष तसेच उमेदवार टीका करताना मुका, पागल, सरफिरा, आंधळा, चकणा, हिरा, लंगडा, लुळा, अपंग अशांसारखे शब्द काही वेळेस वापरतात. मात्र अशा शब्दांचा वापर करून दुसऱ्याचा अवमान करणे टाळले पाहिजे.
...तर कारवाईआयोगाने म्हटले आहे की, दिव्यांगांबद्दल अवमानकारक उल्लेख करणाऱ्यांवर दिव्यांग व्यक्तींचे हक्क कायदा, २०१६तील ९२व्या कलमाद्वारे कारवाई देखील होऊ शकते.राजकीय पक्षांनी दिव्यांग व्यक्तींचा समावेश पक्षकार्यकर्ता किंवा सदस्य म्हणून करायला हवा. त्यांना समान संधी प्रदान करायला हवी.
लैंगिक भेदभाव करणारी भाषा वापरू नकाnआयोगाने म्हटले आहे की, राजकीय पक्षांनी कुठेही दिव्यांगांचा अवमान होईल अशी भाषा वापरली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. nआम्ही दिव्यांग व्यक्तींबद्दल अवमानकारक तसेच लैंगिक भेदभाव करणारी भाषा वापरणार नाही, असे राजकीय पक्षांनी आपल्या वेबसाइटवरून जाहीर केले पाहिजे.nदिव्यांगांचा आदरपूर्वक कसा उल्लेख करावा याचे राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे.