लखनौ - निवडणूक आयोगाने देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे न्यूज चॅनेल्स आणि विविध संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षण दाखवण्यात येत आहे. सर्वेक्षणातून उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या पक्षाचं सरकार स्थापन होईल, कोणाला किती जागा मिळतील, येथील नागरिकांचा मूड काय? असे म्हणत ही आकडेवारी जारी करण्यात येत आहे.
युपीत भाजपला मोठे धक्के बसले असून 3 मंत्र्यांसह डझनभर आमदारांनी भाजपला राम राम केला आहे. त्यामुळे, भाजपची ताकद कमी झाल्याचं बोललं जातंय. मात्र, टाइम्स नाऊ आणि नवभारतने केलेल्या सर्वेक्षणातून उत्तर प्रदेशमध्ये पश्चिम उत्तर प्रदेश ते पूर्वांचलपर्यंत कुणाला किती जागांवर विजय मिळेल, कोणाच्या पारड्यात मतदार वजन टाकणार हे आकडेवारीतून दर्शविण्यात आलं आहे.
यूपीमध्ये कोणाला किती जागां मिळतील
भाजप+: 219-245सपा + : 143-154काँग्रेस : 8-14बसपा : 8-14इतर : 0-3
युपीमध्ये कोणाला किती टक्के मत
भाजप+: 37.2सपा +: 35.1काँग्रेस: 9.7बसपा: 12.1इतर : 5.8
सेंट्रल युपीमध्ये कोण मारणार बाजी
भाजपाा+: 18-21सपा + : 13-14काँग्रेस : 1-2बसपा : 0-1इतर : 0
अवधमध्ये भाजपा पुढे
भाजप +: 55-63सपा +: 32-33काँग्रेस : 2-3बसपा : 3-4इतर : 0-1
पश्चिम युपीमध्ये कोण असणार पुढे
भाजपा +: 54-56सपा : 37-40काँग्रेस : 3-4बसपा : 0-1इतर : 0
रूहेलखंडमध्ये कोणाला किती फायदा
भाजपा+: 30-34सपा +: 17-18काँग्रेस : 1-2बसपा : 1-2इतर : 0
बुंदेलखंडमध्ये कोण असणार पुढे
भाजपा +: 13-14सपा+: 4-5काँग्रेस: 0-1बसपा : 0-1इतर : 0