शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
3
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
4
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
5
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
6
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
7
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
13
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
14
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

लोकसभाध्यक्षपदासाठी ४८ वर्षांनी निवडणूक; ओम बिर्ला आणि के. सुरेश यांच्यात आज लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 6:17 AM

लोकसभा अध्यक्षपदासाठी मंगळवारी सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकले नाही.

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदासाठी मंगळवारी सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे एनडीएचे उमेदवार आणि भाजप खासदार ओम बिर्ला यांची लढत काँग्रेसच्या कोडीकुन्नील सुरेश यांच्याशी बुधवारी होणार आहे. असे झाल्यास लोकसभेच्या इतिहासात फक्त चौथ्यांदाच मतदान होणार आहे. यापूर्वी लोकसभाध्यक्षपदासाठी १९५२, १९६७ आणि १९७६ अशा तीन प्रसंगी निवडणूक झाली आहे.

बिर्ला आणि सुरेश यांनी मंगळवारी अनुक्रमे एनडीए व इंडियाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले. बिर्ला यांना पाठिंबा देण्याच्या बदल्यात विरोधी पक्ष 'इंडिया' आघाडीला उपाध्यक्षपद हवे होते. पण, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही अट मान्य न केल्याने विरोधकांनी या निवडणुकीसाठी उमेदवार उतरविण्याचे ठरविले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या संसद भवनातील कार्यालयात काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि द्रमुकचे टी.आर. बालू यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची उपस्थिती होती. मात्र, दोन्ही बाजूंकडील नेते आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे तोडगा निघू शकला नाही. लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास नकार देत वेणुगोपाल आणि बालू हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयातून बाहेर पडले.

आकडे काय सांगतात? - सभागृहात भाजपसह एनडीएचे २९३ खासदार तर इंडियाआघाडीकडे २३३ सदस्य आहेत.- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधून राजीनामा दिल्याने सभागृहातील सदस्य संख्या ५४२ झाली आहे. किमान तीन अपक्ष सदस्यही विरोधी गटात असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस, भाजपचे व्हीपलोकसभाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी उद्या सर्व खासदारांनी सभागृहात उपस्थित राहावे असा तीन ओळींचा व्हीप काँग्रेस पक्षाने मंगळवारी जारी केला आहे. भाजपनेही आपल्या सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीप्रसंगी उपस्थित राहावे, असा व्हीप काढला आहे.

उमेदवारावर चर्चा झाली नाही : तृणमूल काँग्रेस लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधी आघाडी 'इंडिया'चे संयुक्त उमेदवार के. सुरेश यांना उमेदवारी देण्यापूर्वी आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही, असे तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

जगनमोहन रेड्डी यांचा ओम बिर्ला यांना पाठिंबाआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी हे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओम बिर्ला यांना पाठिंबा देणार आहेत. लोकसभेत एनडीएची २९७ मते बिर्ला यांना मिळणार हे गृहीत होते. आता वायएसआर काँग्रेस पक्षाच्या खासदारांची मतेही ओम बिर्ला यांना मिळतील.

जिंकणे किंवा हरणे हा मुद्दा इथे महत्त्वाचा नाही. तर, परंपरेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. लोकसभा अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचा आणि उपाध्यक्ष विरोधकांचा असायला हवा. - के. सुरेश, इंडिया आघाडीचे उमेदवार

उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची परंपरा : राहुल गांधी- काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची परंपरा आहे. - जर एनडीए सरकारने या परंपरेचे पालन केले तर पूर्ण विरोधी पक्ष सभागृहात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारचे समर्थन करेल.- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना फोन केला होता आणि पुन्हा फोन करण्याबाबत बोलले होते. फोन आला नाही.- पंतप्रधान विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा करतात. मात्र, काँग्रेस नेत्याचा अपमान होत आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाom birlaओम बिर्लाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेस