नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या सर्व ६९ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली.गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा त्यांनी जाहीर केल्या नाहीत. मात्र गुजरातमध्ये १८ डिसेंबरपूर्वी निवडणुका होतील, असे ते म्हणाले. हिमाचल प्रदेशात ९ नोव्हेंबर रोजी ७,४७९ मतदान केंद्रांवर एकाच टप्प्यात मतदान होईल.सर्व केंद्रांवर मतदारांनी केलेल्या मतदानाची लेखी पावती देण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राची सोय असेल. मतमोजणी १८ डिसेंबरला होईल.विधानसभेची मुदत७ जानेवारी रोजी संपत आहे. गुजरातच्या निवडणुका जाहीर न केल्याबद्दल काँग्रेसने आयोगावर टीका केली आहे.
हिमाचलमध्ये निवडणूक; ९ नोव्हेंबर रोजी मतदान , गुजरातच्या तारखा जाहीर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 4:38 AM