Election Result 2023: 'हा काँग्रेसचा पराभव, ना की...'; 3 राज्यांतील भाजप विजयावर ममता बॅनर्जीं काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 06:21 PM2023-12-04T18:21:02+5:302023-12-04T18:22:22+5:30
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजप विजयाने आणि काँग्रेसच्या पराभवाने विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजप विजयाने आणि काँग्रेसच्या पराभवाने विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढविल्याने मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला, असे आघाडीतील मित्रपक्षांनी म्हटले आहे.
यातच, तृणमूल काँग्रेस (TMC) प्रमुख ममता बनर्जी यांनी सोमवारी भाजपच्या विजयासंदर्भात प्रतिक्रिया देताना, "काँग्रेसने इंडिया अलायन्समधील इतर सदस्यांवर जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासंदर्भात विश्वास ठेवला नाही. ज्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर हा काँग्रेसचा पराभव आहे, ना की जनतेचा, असेही ममता यांनी म्हटले आहे.
"काँग्रेसने तेलंगणामध्ये विजय मिळवला. त्यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातही विजय मिळाला असता. काही मते इंडिया अलायन्समधील पक्षांमुळे कमी झाली. आम्ही जागावाटपाचा सल्ला दिला होता, हे खरे आहे," असेही ममता म्हणाल्या.
'2024 मध्ये भाजप सत्तेत येणार नाही' -
ममता म्हणाल्या, "विचारधारेबरोबरच आपल्याला एका रणनीतीचीही आवश्यकता आहे. अशात जर जागावाटपावर एकमत झाले, तर भाजप 2024 मध्ये सत्तेवर येणार नाही. इंडिया अलायन्स पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी एकत्रीत काम करेल आणि चुका सुधारेल."