ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 11 - उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात 5 राज्यांतील स्पष्ट निकाल हाती येतील. सर्व पक्षातील नेते विजयाचा दावा करत आम्हालाच बहुमत मिळणार, अशी आशा व्यक्त करत आहेत.
स्पष्ट निकाल समोर आल्यानंतर हारतुरे, मिठाई, रंगांची उधळण करुन जल्लोष साजरा करण्यासाठीही प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. आता सर्व जण केवळ निकाल हाती येण्याची वाट पाहत आहे. या पार्श्वभूमीवर मिठाई, फुलांच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत.
निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर मिठाई आणि हारतुरे, फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे लक्षात घेऊन बाजारपेठांमध्ये मिठाई, हारतुरे बनवण्याची लगबग सुरू आहे. मिठाईंमध्ये सर्वाधिक मागणी लाडूंची होत आहे. लाडूंनंतर बर्फीची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दुकानांकडून सांगण्यात येत आहे. जल्लोष, विजयोत्सवात आपल्याकडून काहीही कमी होऊ नये, यासाठी काही राजकीय पक्ष स्वतः मिठाई बनवत आहेत, तर काही पक्षांनी मिठाई आणि फुलांची आधीच ऑर्डर दिली आहे.
मिठाई, फुले आणि फटाक्यांच्या आतिषबाजी यांशिवाय निवडणुकीतील विजयोत्सव अपूर्ण असल्याचे मानले जाते. जागांचे निकाल हाती आल्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यालयात आणि नेत्यांमध्ये विजयाचा जल्लोष करण्यासाठी सुरुवात होईल. काही ठिकाणी तर जल्लोषासाठी सुरुवातही करण्यात आली आहे.
Uttar Pradesh: 'Ladoos' being prepared in Varanasi ahead of the #ElectionResults tomorrow pic.twitter.com/8BAdYJDE5K— ANI UP (@ANINewsUP) March 10, 2017
BJP leading in Uttar Pradesh: Party workers celebrate in Lucknow #ElectionResultspic.twitter.com/SmmoBRNKSV— ANI UP (@ANINewsUP) March 11, 2017