हरियाणातील ज्या राजकीय पिचवर सेहवागनं 'बॅटिंग' केली, कशी आहे तिथली स्थिती? कुणासाठी केला होता प्रचार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 12:24 PM2024-10-08T12:24:04+5:302024-10-08T12:25:21+5:30

तोशाम हा राज्यातील एक चर्चेत असलेला मतदारसंघ होता. येथे भारतीय क्रिकेट संघाचा माजी तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने प्रचार केला होता...

Election Results 2024 How is the political situation in Haryana where virender sehwag campaign for the congress candidate anirudh chaudhry | हरियाणातील ज्या राजकीय पिचवर सेहवागनं 'बॅटिंग' केली, कशी आहे तिथली स्थिती? कुणासाठी केला होता प्रचार? जाणून घ्या

हरियाणातील ज्या राजकीय पिचवर सेहवागनं 'बॅटिंग' केली, कशी आहे तिथली स्थिती? कुणासाठी केला होता प्रचार? जाणून घ्या

हरियाणात विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज येत आहेत. राज्यातील तोशाम जागेवरील मत मोजणी सुरू आहे. यथे भाजपच्या श्रुती चौधरी, काँग्रेस नेते अनिरूद्ध चौधरी यांच्यापेक्षा 2610 मतांनी आघाडीवर आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रुती यांना आतापर्यंत 32816 मते मिळाली आहेत. तोशाम हा राज्यातील एक चर्चेत असलेला मतदारसंघ होता. येथे भारतीय क्रिकेट संघाचा माजी तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यासाटी प्रचार केला होता.

निवडणुकीत चुलत भाऊ- बहिणीत टक्कर - 
या जागेवर राजकारणातील एकाच कुटुंबातील दोन सदस्य वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढत आहेत. येते भाजपने माजी मुख्यमंत्री बंसीलाल यांची नात आणि किरण चौधरी यांची मुलगी श्रुती चौधरीला तिकीट दिले होते. तर काँग्रेसने बंसीलाल यांचे नातू तथा श्रुती यांचे चुलत भाऊ अनिरुद्ध चौधरी यांना तिकीट दिले होते.

आतापर्यंत किरण चौधरी यांनी बन्सीलाल यांचा वारसा सांभाळला होता. त्या तोशाम मतदारसंघातून सलग पाच वेळा विधानसभेत पोहोचल्या होत्या. मात्र अनिरुद्ध मैदानात उतरल्यानंतर यावेळची ही लढत चुरशीची होती.

तोशाम मतदारसंघात सेहवागने केला होता प्रचार - 
महत्वाचे म्हणजे, तोशाम जागेसाठी माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यासाठी निवडणूक प्रचार केला होता. प्रचारादरम्यान तो म्हणाला होता, "मी त्यांना (अनिरुद्ध चौधरी) आपला भाऊ मानतो. त्यांचे वडील (रणबीर सिंह महेंद्र), जे बीसीसीआयचे अध्यक्ष देखील होते. त्यांनी नेहमीच माझे समर्थन केले. हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि मला वाटते की, मी त्यांची मदत करू शकेल. मी तोशामच्या नगरिकांना अनिरुद्ध चौधरी यांना विजयी करण्याचे आवाहन करतो."

Web Title: Election Results 2024 How is the political situation in Haryana where virender sehwag campaign for the congress candidate anirudh chaudhry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.